शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

भाषाप्रेमींनी आगरी शालेत गिरवले आगरी व्याकरणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:56 IST

आगरी बोली प्रचार-प्रसाराच्या संवर्धनाच्या उद्देशार्थ युवा साहित्यिक सर्वेश तरे यांच्या संकल्पनेतून ‘आगरी शाला’ हा अभिनव उपक्रम सुरू झाला असून सर्व स्थरातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

ठळक मुद्दे आगरी शालेत गिरवले आगरी व्याकरणाचे धडे‘आगरी शाला’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद आगरी शालेची सांगता २० मे रोजी

ठाणे : सध्या ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात चालू असलेल्या बोलीभाषा संवर्धनार्थ आगरी शाला या उपक्रमाला प्रतिसाद वाढत आहे. अनेक आगरी-बिगर आगरी प्रशिक्षणार्थी आवर्जून आगरी शालेला हजेरी लावत आहेत. शनिवा १२ मे आणि रविवार १३ मे रोजी या आगरी शालेचे सहावे, सातवे, आणि आठवे सत्र पार पडले.

यात गजानन पाटील,मोरेश्वर पाटील आणि सर्वेश तरे यांनी मार्गदर्शन केले. गजानन पाटील यांनी आगरी साहित्यावर बोलताना काही विनोदी कविता आणि किस्से सांगीतले त्याच बरोबर बोलीभाषेचा व्यवहारातही वापर कसा करता येईल यावर मार्गदर्शन केले. मोरेश्वर पाटील यांनी आगरी बोलीत प्रमाण मराठीतले शब्द कसे कमी होत जातात यावर सांगत खायायला चं खावाला होणं,जेवायला-जेवाला आणि खेळायला चं खेलाला होतं अशी उदाहरणे दिली. सर्वेश तरी यांनी ‘आगरी बोली काल-आज-उद्या’ या विषयावर बोलताना आगरी बोलीतील बाराखडी सांगीतली. त्याच बरोबर आगरी बोलीत ळ,ण,छ,ष,क्ष,ज्ञ,ए,ऐ,ओ या वर्णाक्षरांचा वापर होत नसून त्या जागी अनुक्रमे ल,न,स-श्य,श-ख,न्य,य,आय,व या वर्णाक्षरांचा शब्दात वापर केला जातो असे म्हटले. त्यानंतर सत्रात सर्वेश तरे यांनी आगरी बोलीचं व्याकरण समजवताना आगरी एकवचन-अनेकवचन, कालदर्शक-गतीदर्शक-स्थळदर्शक ई.आगरी शब्द,आगरी म्हणी जसं की ‘वाकरे कुरघीला वाकरा दर’ म्हणजे माणूस पाहून तसे वागणे, त्या नंतर आगरी वाक्यप्रचार जसं की ‘चिचवशी साश देने’ म्हणजे खोटी साक्ष देणे अशा प्रकारचे म्हणी, वाक्यप्रचार, तसेच कोड्यांचा उल्लेख केला. या सत्रा दरम्यान महाराष्ट्रातून वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी रिध्दी म्हात्रे उपस्थित होती. ती प्रमाण भाषेत उत्तम व्याख्याता असून शहरात राहून, मुंबईत उच्चशिक्षण घेऊनही घरी आपली आगरी बोलते अन ‘धवला’ साहित्यप्रकार अवगत असल्याने आगरी शालेत तिचा सत्कार करण्यात आला.सोबत पेणवरून आलेले साहित्यिक रायगडभुषण म.वा म्हात्रे, जुचंद्रचे प्रसिध्द रांगोळीकार शैलेश पाटीलहेही उपस्थित होते. आगरी शालेचे प्रशिक्षणार्थींना इतकी गोडी लागली आहे की प्रशिक्षणार्थी रोहन गायकर हे थेट शालेला आगरी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते. आगरी शाळेचे पुढील सत्र १९ मे ला ४ ते ६ वाजता कशेळीतील मराठी शाळेत होणार असुन त्याच प्रकाश पाटील,हास्यप्रबोधनकार संजीवन म्हात्रे,दया नाईक मार्गदर्शन करणार आहेत. आगरी शालेची सांगता २० मे रोजी होणार असुन या दिवशी प्रविण पाटील यांचे आगरी बोलीतील लघुनाटिका होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई