शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी ९५५ पालकांची शाळेकडे पाठ

By admin | Updated: April 21, 2017 00:01 IST

उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील ८०८ शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणात १६ हजार ४५५ विद्यार्थ्यांना नर्सरीपासून ते

सुरेश लोखंडे ,  ठाणेउच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील ८०८ शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणात १६ हजार ४५५ विद्यार्थ्यांना नर्सरीपासून ते पहिलीपर्यंत मोफत प्रवेश दिला जात आहे. आतापर्यंत सुमारे चार हजार १८३ बालकांचे प्रवेश झाले. मात्र, सुमारे ९५५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी संबंधित पालक या शाळांकडे फिरकलेच नसल्याचे निदर्शनास आले आहे.उच्चभ्रू कुटुंबातील मुले शिक्षण घेत असलेल्या सीबीएसई, एसएससी आदी बोर्डांच्या खाजगी शाळांमध्ये मागासवर्गीय, दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना शिक्षण हक्काखाली (आरटीई) आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जात आहे. या गरिबांच्या मुलांनादेखील या उच्चभ्रू कुटुंबातील मुलांसोबत शिकता यावे, म्हणून त्यांच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणातून गरिबांच्या मुलांना प्रवेश देणे सक्तीचे केले आहे. आतापर्यंतच्या तिसऱ्या फेरीअखेर जिल्ह्यातील चार हजार १८३ बालकांचे प्रवेश झाले आहेत. परंतु, संबंधित विद्यार्थ्यांचे सुमारे ९५५ पालक दिलेल्या शाळांत गेलेच नसल्याचे दिसले. पालकांच्या उदासीनतेमुळे किंवा त्यांच्या अज्ञानामुळे दिलेल्या शाळेत पालक न गेल्यामुळे ९५५ विद्यार्थी या प्रवेशावाचून वंचित आहेत. सध्या तिसऱ्या फेरीचे प्रवेश शाळांमध्ये घेतले जात आहेत. २८ एप्रिलपर्यंत संबंधित पालकांना दिलेल्या शाळांमध्ये जाऊन पाल्याचा प्रवेश घेता येणार आहे. या तिसऱ्या फेरीत एक हजार ९२६ बालकांचे प्रवेश होणार आहेत. आतापर्यंत ७३४ प्रवेश झाले असून २२ बालकांचे प्रवेश विविध कारणांखाली नाकारले आहेत. उर्वरित २९७ बालकांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्यामुळे ते या फेरीत मिळालेल्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकले नाहीत. तर, ८८१ बालकांचे वडील शाळेत प्रवेशासाठी गेलेच नाही. यामुळे त्यांचे अद्याप प्रवेश झाले नाही. या पालकांना आताही शाळेत जाऊन पाल्याचे प्रवेश घेता येतील. या प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात तीन हजार ४५० प्रवेश झाले आहेत. तर, या दुसऱ्या टप्प्यात ६१३ शाळांमध्ये एक हजार ९२६ मुलांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ३२४ प्रवेश झाले. चार विद्यार्थ्यांचे प्रवेश वेगवेगळ्या कारणांखाली नाकारण्यात आले असता ७१ पालक शाळेत जाऊन प्रवेश घेऊ शकले नाहीत.