शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वेढीगावात बिबट्याने वासरु पळवले

By admin | Updated: April 19, 2017 00:07 IST

येथील पश्चिम भागातील गाव पाड्यांच्या हद्दीमध्ये बिबट्याचा वावर वाढल असून मंगळवारी बिबट्याने हल्लाकरून वेढी गावातील वासराचा फडशा पाडला आहे.

सफाळे : येथील पश्चिम भागातील गाव पाड्यांच्या हद्दीमध्ये बिबट्याचा वावर वाढल असून मंगळवारी बिबट्याने हल्लाकरून वेढी गावातील वासराचा फडशा पाडला आहे. आतापर्यंतची गावात शिरुन हल्ला करण्याची ही पहिलीच घटना असल्याने आतापर्यंत वनविभागाने जागोजागी लावलेले ट्रॉप कॅमेरे काय कामाचे असा सवाल विचारला जात आहे. विशेष म्हणजे बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने जागोजागी सूचना फलके लावले आहेत. मात्र, बिबट्या पकडण्यासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही.पश्चिमेकडील किरईपाडा भवानगड चटाळे, मथाणे, विराथन, आदी भागामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे निष्पन्न झाले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी किरईपाडा येथे पाण्याच्या स्रोताजवळ बिबट्याच्या लहान व मोठ्या पायांचे ठसे पाहिले होते. यामुळे एक मादी व बछडा बिबट्याचा वावर या भागात असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. दोन महिन्यांपासून नागरी वस्तीत अन्नाच्या शोधात आलेल्या बिबट्याने आतापर्यंत नागरिकांवर हल्ला केल्याचे वृत्त नव्हते. मात्र, आज पहाटे वेढी गावातील जितेंद्र म्हात्रे यांच्या घराजवळील गोठ्यातून गाईचे वासरु च त्याने पळवून नेले. म्हात्रे सकाळीच आपल्या मुलासोबत मुंबईला गेले होते. त्यांची पत्नी प्रीतीजा यांना गोठ्यात वासरू दिसले नाही. शोधाशोध केली असता झाडाझुडपात वासराचे अर्ध शरीर त्यांना आढळले. या घटनेची माहिती त्यांनी वनविभागाच्या अधिकार्ऱ्यांना दिली. त्यानुसार अधिकायाऱ्यांनी घटनास्थाळाची पाहणी करून सायंकाळी त्यांच्या घराजवळ कॅमेरे बसविले. तर पाण्याचा मुबलक साठा, रानडुक्कर इ. खाद्य उपलब्ध असल्याने बिबट्या सफाळ्याच्या पश्चिम भागात वावर करत असल्याचेही वनविभागाचे अधिकारी डी. बी. देसले यांनी दिली. (वार्ताहर)