शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नरभक्षक वाघावर विधानसभेत लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:55 IST

आॅक्टोबर महिन्यात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेऊन नरभक्षक वाघाने तिवसा तालुक्यातही नागरिकांना जेरीस आणले होते. या मुद्द्यावर बुधवारी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर विधानसभेत लक्षवेधी मांडत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धारेवर धरले.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर आक्रमक : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या

सूरज दाहाट ।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : आॅक्टोबर महिन्यात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा बळी घेऊन नरभक्षक वाघाने तिवसा तालुक्यातही नागरिकांना जेरीस आणले होते. या मुद्द्यावर बुधवारी तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर विधानसभेत लक्षवेधी मांडत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धारेवर धरले. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा व शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.नरभक्षक वाघाने धामणगाव रेल्वे तालुक्यात दोघांचा बळी घेतल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. तिवसा येथे नरभक्षक वाघ लोकवस्तीत शिरल्याने हजारो नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला होता. शेतीची कामे ठप्प झाले होते तसेच मजूर वर्गही वाघाच्या भीतीने शेतात जात नव्हता. शेतकºयांना याचा चांगलाच फटका बसला असल्याने नरभक्षक वाघाला जिवंत पकडणे व किंवा ठार मारण्याची मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती.वाघाला बेशुद्ध करण्यासाठी आणलेल्या औषधाची वैधता संपल्याचा आरोपही यशोमती यांनी केला. शेतात हैदोस माजवणाºया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची तसेच वन्यक्षेत्राची मोजणी करून शेतीलगतच्या जंगलाला कुंपण घालण्याची मागणी आ. ठाकूर यांनी केली.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी यशोमती ठाकूर यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर कार्यवाहीचे आश्वासन दिले.