शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

डावखरे यांना कोकणातील प्रमुख संघटनांकडून पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:38 IST

कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपा व रिपब्लिकन पक्ष (ए) आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांना कोकणातील विविध शिक्षक संघटनांकडून पाठिंबा देण्यात आला आहे.

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपा व रिपब्लिकन पक्ष (ए) आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांना कोकणातील विविध शिक्षक संघटनांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. सहा वर्षांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यात पुढाकार घेतल्यामुळे शिक्षकांकडून त्यांना पसंती मिळत आहे.कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष वेणुनाथ कडू, महाराष्ट्र स्वाभिमान शिक्षक संघाचे संस्थापक किसन कथोरे, माजी आमदार शिवाजीराव पाटील यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल भारतीय शिक्षक परिषदेची रत्नागिरी शाखा, मुप्टा महाराष्ट्र मराठी शाळा शिक्षक संघटना, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ आणि महाराष्ट्र राज्य कला क्र ीडा व कार्यानुभव शिक्षक संघाने पाठिंबा जाहीर केला आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी आॅनलाइन पद्धत, भविष्य निर्वाह निधी व सर्व्हिस बुक रेकॉर्ड आॅनलाइन, शालेय वेतनप्रणाली, पीएफ स्लिपा, थकीत वेतनबिले, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची प्रकरणे, तुकड्यांच्या अनुदानाचा प्रश्न, पदवीधर शिक्षकांचे वेतनप्रश्न, नवीन शिक्षकभरती, शिक्षक अनुकंपा प्रकरणे आदी कामे होण्यासाठी डावखरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शिक्षकांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ते सातत्याने सरकारकडे दाद मागत होते. यंदा शालार्थ प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर अ‍ॅड. डावखरे यांनी तातडीने सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर, सरकारने आॅनलाइन वेतन करण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे वेतन रखडलेल्या हजारो शिक्षकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.