शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

'आरक्षित भूखंड मोकळे करून द्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 02:38 IST

सद्य:स्थितीत कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाला अतिक्रमणविरोधात जोमाने सुरू असलेली कारवाई पाहता आमचे आरक्षित भूखंड मोकळे करून द्या, अशी मागणी आता कल्याणमधील फेरीवाल्यांकडून होत आहे.

कल्याण : सद्य:स्थितीत कल्याण-डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाला अतिक्रमणविरोधात जोमाने सुरू असलेली कारवाई पाहता आमचे आरक्षित भूखंड मोकळे करून द्या, अशी मागणी आता कल्याणमधील फेरीवाल्यांकडून होत आहे. डोंबिवलीमधील फेरीवाल्यांची ही मागणी आधीपासूनची असून कल्याणमधील फेरीवाला संघटना आता यासंदर्भात केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेणार आहेत.सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वेस्थानकांपासून १५० मीटर परिक्षेत्रात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे चित्र असताना सद्य:स्थितीत महापौर विनीता राणे यांनी यात जातीने लक्ष घातल्याने फेरीवाल्यांविरोधातल्या कारवाईला वेग आला आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्याऐवजी कारवाईलाच प्राधान्य दिले जात असल्याने फेरीवाल्यांमध्ये कारवाईबाबत रोष आहे. नुकतीच याची प्रचीती डोंबिवलीत आली. फेरीवालाविरोधी पथकाची गाडी अडवून ठिय्या आंदोलन छेडल्याची घटना गुरुवारी घडली होती. दरम्यान, जोपर्यंत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आमचे आरक्षित भूखंड व्यवसायासाठी मोकळे करून द्या, अशी मागणी आता होत आहे. कल्याणमधील फेरीवाला संघटनांचे अध्यक्ष अरविंद मोरे आणि प्रशांत माळी यांनी याकडे लक्ष वेधले आहे. फेरीवाल्यांना १५० मीटर परिक्षेत्रात व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु, महापालिकेची कारवाई त्या परिक्षेत्राबाहेरही सुरू असल्याचे मोरे यांचे म्हणणे आहे. ही अन्यायकारक कारवाई त्वरित थांबली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तर, माळी यांनी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होईपर्यंत आम्हाला व्यवसायासाठी फेरीवाल्यांसाठी आरक्षित असलेले भूखंड मोकळे करून देण्याची मागणी केली आहे. २०१४ मध्ये जो सर्व्हे झाला, त्याप्रमाणे केडीएमसीच्या हद्दीत नऊ हजार ९३५ फेरीवाले आढळून आले आहेत. धोरण ठरवण्यासाठी नगर पथ विके्रता समिती म्हणून गठीत केली आहे.>कारवाई थांबविण्याची मागणीया समितीच्या दोन ते तीन बैठका झाल्या. यातही आरक्षित भूखंडाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. परंतु, नगररचना विभागाकडून योग्य प्रकारे माहिती दिली जात नसल्याचे माळी यांचे म्हणणे आहे. लवकरच फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घ्यावा. अन्यायकारक कारवाई त्वरित थांबवावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मोरे यांनी ‘लोकमत’ला दिला.