शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

नेतृत्वाच्या धनवंतांना पायघड्या

By admin | Updated: February 6, 2017 04:39 IST

मुख्यमंत्र्यांनी ज्या पारदर्शकतेचा उच्चार केला, तिची पायमल्ली करून ठाण्यातील भाजपाच्या नेतृत्वाने आर्थिक बाजू मजबूत असलेल्यांनाच तिकीटवाटप केल्याचा आरोप

ठाणे : मुख्यमंत्र्यांनी ज्या पारदर्शकतेचा उच्चार केला, तिची पायमल्ली करून ठाण्यातील भाजपाच्या नेतृत्वाने आर्थिक बाजू मजबूत असलेल्यांनाच तिकीटवाटप केल्याचा आरोप भाजपाच्या नाराज २२ बंडखोरांनी केला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा देऊन पक्षाविरोधात दंड थोपटून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.ठाण्यातील भाजपाच्या तिकीटवाटपावरून आधीच धुसफूस सुरू असून राडेदेखील झाले. आता तिकीट नाकारलेल्या निष्ठावंतांनी भाजपाच्या नेतृत्वावरच आरोप केले आहेत. रविवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शशी यादव (ठाणे शहर सचिव) संदीप तोरे, वनिता कांबळे, रमेश कांबळे, प्रदीप सिंग, सुभाष यादव, अरुण द्विवेदी, ऊर्मिला द्विवेदी, रमाशंकर यादव, सुनील शहा, दीप्ती चंदगडकर (महिला मोर्चा सरचिटणीस - ठाणे शहर) दिनेश चौहान, उषा मेहता, सीताराम डामरे, वीरेंद्र सावंत, तृप्ती जोशी पाटील, कुणाल भोईर, राजेश कटारिया, दीपक पटले, निलेश कोळी आदींसह इतर महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. ते देत असताना आपण पक्षाचेच काम करणार असल्याचेही त्यांनी या वेळी जाहीर केले. त्यातही या वेळी उपस्थित असलेले माजी उपमहापौर अ‍ॅड. सुभाष काळे यांनीदेखील नेतृत्वावर शंका उपस्थित करून आम्ही मागील कित्येक वर्षे पक्षासाठी काम करीत असतानादेखील बाहेरून आलेल्यांसाठी आमची तिकीटे कापली जात असल्याचा आरोप केला. तर, शशी यादव यांनी प्रांतवादाचा मुद्दा उपस्थित करून केवळ मी उत्तर भारतीय असल्यानेच माझे तिकीट कापल्याचे सांगितले. महिला मोर्चापैकी कोणत्याही महिलेला तिकीट दिले नसून नेतृत्वाला भेटण्याची संधीदेखील डावलली जात असल्याचे सांगून निष्ठावंतांना सापत्न वागणूक दिल्याचा आरोप तृप्ती जोशी-पाटील यांनी केला. निष्ठावंतांचे तिकीट कापून बाहेरून आलेल्या पैसेवाल्यांसाठी पायघड्या घातल्या जात असल्याचा आरोप निलेश कोळी यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात बोलताना सांगितले होते की,नेत्यांच्या मागेमागे फिरणाऱ्या, हुजरेगिरी करणाऱ्यांना, नेत्यांच्या शिफारशीने येणाऱ्या लोकांना तिकीट दिले जाणार नाही. परंतु, त्यांच्या या आदेशालाच ठाण्यातील नेतृत्वाने तिलांजली दिल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला. आमच्यासारख्या जुन्या निष्ठावंतांना तिकीटवाटपात डावलण्यात आल्याने आम्ही पदांचे राजीनामे देत आहोत. २२ जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे, त्या भूमिकेत कायम राहणार असून अपक्ष म्हणून सर्व जण निवडणूक लढवू, असे यादव यांनी या वेळी स्पष्ट केले. बंडखोरांबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या श्रेष्ठींनी एका आमदारास घेऊन गुप्त बैठक घेऊन दक्ष होऊन ‘सन्यस्थ खग्ड’ हातात घेऊन थेट धडा शिकवायचा, की संघ आरम करायचा याबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. (प्रतिनिधी)