शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

उल्हासनगरात टेंडर घोटाळ्याच्या आरोपावरून भाजप व शिवसेना शिंदे गटाचे नेते आमने-सामने 

By सदानंद नाईक | Updated: January 21, 2024 19:07 IST

भाजप अध्यक्ष प्रदीप रामचंदानी २० टक्के भागीदार...प्रेम झा यांचा आरोप.

उल्हासनगर : भाजपने शनिवारी पत्रकार परिषदेत घेऊन टेंडर घोटाळ्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यासह पी अँड झा कंपनीवर घोटाळ्याचे आरोप केल्याने, भाजप व शिवसेना नेते आमने-सामने आल्याचे चित्र आहे. आरोप करणारे भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी हे महापालिका बांधकाम विभागाच्या कामात २० टक्के पार्टनर असल्याची माहिती प्रेम झा यांनी देऊन भाजपच्या आरोपातील हवा काढून टाकली आहे.

 उल्हासनगर महापालिकेने मूलभूत सुखसुविधाच्या ४२ कोटीच्या निधीतून गेल्या दोन महिन्यापूर्वी निविदा काढली होती. या निविदेत विविध १५८ पेक्षा जास्त विकास कामे आहेत. यामध्ये नाल्या बांधणे, पायवाट बांधणे, समाजमंदिर, तसेच दुरुस्तीचे कामे आहेत. ही कामे एकाच ठेकेदाराला न मिळता, लहान ठेकेदाराला मिळावी. अशी मागणी झाली होती. मात्र निविदेतील अटीशर्तीनुसार ही निविदा एकाच कंपनीला मिळाली. यातूनच भाजप विरुद्ध शिवसेना नेत्यांचा सामना रंगल्याचे बोलले जाते. भाजपचे अध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान व पी अँड झा कंपनीचे प्रमुख प्रेम झा यांच्यावर आरोप केले. या आरोपाचे खंडन पत्रकार परिषदेत शिवसेनानेते अरुण अशान व पी अँड झा कंपनीचे प्रेम झा यांनी केले आहे. 

रामचंदानी २० टक्के भागीदार भाजपने पत्रकार परिषद घेऊन ज्या पी अँड झा कंपनीवर आरोप केले. त्या कंपनीचे प्रमुख प्रेम झा यांनी महापालिका बांधकाम विभागाच्या कामात भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी २० टक्के पार्टनर असल्याचे सांगून खळबळ उडून दिली. टेंडर घोटाळ्याच्या आरोपावरून भाजप वादात सापडला असून पक्षनेत्यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोल्डन गॅंग सक्रियशहरातील विकास कामात ढवळाढवळ करणारी गोल्डन गॅंग यापूर्वी चर्चेत होती. मध्यंतरी गोल्डन गॅंग बाबतची चर्चा बंद झाली. मात्र टेंडरवार वरून भाजप व शिवसेना नेते आमने-सामने आल्यावर पुन्हा गोल्डन गॅंग सक्रिय झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. 

 महापालिका आयुक्त अजीज शेखच्या भूमिकेकडे लक्ष शहरात हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू असून न झालेल्या कामाचे बिल निघत असल्याचे बोलले जात आहे. एकूणच महापालिका कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून आयुक्त अजीज शेख या दोन पक्ष नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपावर काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर