शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या दुरुस्तीसाठी सभागृह नेत्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:40 IST

पाच लाखांचा निधी देणार : शहर अभियंत्यांना दिले पत्र; अन्य नगरसेवकांच्या कृतीकडे लागले लक्ष

कल्याण : केडीएमटीच्या आगारात खितपत पडलेल्या ६९ बस दुरुस्त करून चालविण्यासाठी नगरसेवक निधीही देण्याची घोषणा काही नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या महासभेत केली होती. त्याप्रमाणे सभागृहनेते प्रकाश पेणकर यांनी आपल्या निधीतील पाच लाखांची रक्कम परिवहन विभागाकडे वर्ग करण्याबाबत शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांना पत्र दिले आहे. दरम्यान, अन्य नगरसेवकही आपला निधी देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वाहकचालकांची कमतरता आणि उत्पन्न व खर्चातील वाढती तफावत पाहता ६९ बसचा लिलाव करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला होता. यासंदर्भातील प्रस्तावाला परिवहन समितीने मान्यता दिली होती. अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव महासभेकडे पाठविला होता. तत्पूर्वी महापौर विनीता राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आगारातील या बसची पाहणीही केली होती.यासंदर्भातील वस्तुस्थिती अहवाल केडीएमटी उपक्रमाने महासभेत ठेवला होता. परंतु, समितीचा पाहणी अहवाल मात्र दाखल केला नाही. दरम्यान, बस लिलावासंदर्भातील प्रस्तावावरील चर्चेत शिवसेनेतील दुफळीचे चित्र पुढे आले. यात काहींनी बस लिलावाच्या बाजूने मते मांडली. तर, काही नगरसेवकांनी बस दुरुस्त करून चालविण्याची भूमिका मांडली. बसदुरुस्तीसाठी नगरसेवक निधीही देण्याची तयारी संबंधितांनी दर्शविली. त्यावेळी बस लिलाव प्रकरणात पैशांचा व्यवहार झाल्याचा आरोपही केला. त्यावर मनसेच्या नगरसेवकांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.मात्र, चर्चेअंती बस लिलावाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. महासभेतील चर्चेप्रमाणे संबंधित नगरसेवक आपल्या नगरसेवक निधीतील काही रक्कम परिवहनला बसदुरुस्तीसाठी वर्ग करतात का, याकडे लक्ष लागले होते.दरम्यान, महासभेत बसच्या लिलावाच्या बाजूने मत मांडणारे सभागृह नेते पेणकर यांनी पुढाकार घेत निधी वर्ग करण्यासंदर्भात शहर अभियंत्यांना पत्र दिले आहे. स्थायी समितीने सुचविलेल्या विविध विकासकामांसाठी तरतूद केलेल्या २५ लाखांच्या नगरसेवक निधीतून पाच लाखांचा निधी ६९ बसदुरुस्तीसाठी वर्ग करावा, असे त्या पत्रात पेणकर यांनी नमूद केले आहे.दुरुस्तीसाठी ७९ लाखांची आवश्यकतापरिवहन उपक्रमाने दिलेल्या अहवालात ६९ बसच्या दुरुस्तीसाठी ७९ लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे. सभागृह नेत्यांनी निधी दिला असला तरी, संचालनातील तूट आणि चालकवाहकांची कमतरता पाहता पुढे दुरुस्तीनंतरही या बस आगारातच खितपत पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका