शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एलबीटीच्या अभय योजनेतून अवघे सात कोटी रुपये जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 01:29 IST

उद्योजकांना नोटिसा बजावल्या : योजनेला केवळ ५० टक्के प्रतिसाद

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांत असलेल्या औद्योगिक परिसरातील कारखानदारांकरिता राज्य सरकारने लागू केलेल्या एलबीटीकराच्या अभय योजनेला ५० टक्केच कारखानदारांनी प्रतिसाद दिला. त्यातून महापालिकेच्या तिजोरीत सात कोटी १८ लाख रुपये जमा झाले आहेत. उर्वरित ५० टक्के कारखानदारांना महापालिकेने पुन्हा नोटिसा बजावणे सुरू केले आहे. अभय योजनेचा लाभ न घेणाऱ्या कारखानदारांना व्याजासह एलबीटी भरावा लागणार आहे. त्यामुळे या ५० टक्के कारखानदारांकडून १२ कोटी रुपये एलबीटी करापोटी येणे अपेक्षित आहे.

महापालिका हद्दीत जेव्हा एलबीटी लागू केला, तेव्हा महापालिकेने एलबीटीकराच्या वसुलीत अव्वल नंबर पटकावला होता. किमान १९० कोटी एलबीटीची वसुली केली होती. मात्र, २७ गावे त्यावेळी महापालिका हद्दीत नव्हती. एलबीटी संपुष्टात येत असताना जून २०१५ मध्ये २७ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील औद्योगिक विभाग महापालिका हद्दीत समाविष्ट झाला. ज्या कारखानदारांची उलाढाल ५० कोटी आहे, असे १९ कारखानदार नोंदणीकृत होते. औद्योगिक परिसरातील कारखान्यांची संख्या ४३० आहे. या कारखानदारांना एलबीटीकर मान्य नव्हता. मूळ कर भरण्यास ही मंडळी तयार होती. मात्र, महापालिकेने मूळ कराच्या थकबाकीपोटी दंड व व्याजाची रक्कम लावल्याने त्यात कोट्यवधींची वाढ झालेली होती. दंड व व्याज कारखानदारांना मान्य नसल्याने कारखानदारांनी राज्य सरकारकडे धाव घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांतील कारखानदारांसाठी एलबीटीची अभय योजना जाहीर केली. ही योजना जानेवारी ते एप्रिल २०१९ दरम्यान होती. या योजनेमुळे महापालिकेस एलबीटीपोटी मिळणाºया १०० कोटींवर पाणी सोडण्याची वेळ आल्याचा दावा जानेवारीत प्रशासनाने केला होता. ही योजना लागू केल्यावर ४३० पैकी २०० कारखानदारांनी या लाभ घेतला. त्यातून महापालिकेस सात कोटी १८ लाख रुपये मिळाले. संबंधित २०० कारखानदारांनी एलबीटीची थकबाकी भरलेली नाही. या कारखानदारांना महापालिकेने एलबीटी भरण्याच्या नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे. नोटिसा पाठवलेल्या कारखानदारांना आता कोणतीही सूट दिली जाणार नाही. त्यांना मूळ थकबाकीची रक्कम व्याजासह भरावी लागणार आहे. सध्या मंदीचा फटका कारखान्यांना बसण्यास सुरुवात झाल्याने हे कारखानदार एलबीटीच्या थकबाकीची रक्कम व्याजासह भरतील की नाही, याविषयी साशंकता आहे. याप्रकरणी सरकारकडेही कारखानदार दाद मागू शकत नाहीत. कारण, सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेऊन त्यांना अभय योजनेचा दिलासा यापूर्वी दिला होता. तसेच ४३० कारखानदारांना महापालिकेने लावलेला दहापट मालमत्ताकर मान्य नाही. याविरोधात कारखानदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.अभय योजना निघाल्या फुसक्या...महापालिका क्षेत्रातील सगळ्याच मालमत्ताकरधारकांसाठी महापालिकेने सरसकट २०१८ मध्ये अभय योजना लागू केली होती. या योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटींची गंगाजळी जमा होईल, असा दावा केला जात होता. तो दावा फोल ठरला. महापालिकेच्या तिजोरीत केवळ ६३ कोटी रुपये जमा झाले. एलबीटीकराच्या अभय योजनेला ५० टक्केच प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अपेक्षित गंगाजळी महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेली नसून अभय योजना फुसक्या ठरल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका