शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीचे अनुदान सरकारकडून रखडले

By admin | Updated: May 5, 2017 05:52 IST

स्थानिक संस्था करापोटी (एलबीटी) सरकारकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेला दरमहा मिळणारे १० कोटी ५३ लाख रुपयांचे

डोंबिवली : स्थानिक संस्था करापोटी (एलबीटी) सरकारकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेला दरमहा मिळणारे १० कोटी ५३ लाख रुपयांचे सहायक अनुदान मिळण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जानेवारी २०१७ पासून आतापर्यंत ३१ कोटी ६६ लाखांचे अर्थसाहाय्य मिळालेले नाही. ते तातडीने मिळावे, यासाठी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे. आधीच आर्थिक घडी विस्कळीत असताना महापालिकेला राज्य सरकारकडून अनुदान मिळण्यास विलंब झाला आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा तीन महिन्यांचे ३१ कोटी ६६ लाखांचे अर्थसाहाय्य मिळावे, असे पत्र मंगळवारी पालकमंत्र्यांना दिल्याचे देवळेकर म्हणाले. तसेच आॅक्टोबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंतचा एक टक्का मुद्रांक शुल्क रक्कमही मिळालेली नाही. ती देखील तातडीने मिळावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.महापालिकेने हा निधी अर्थसंकल्पात गृहीत धरला आहे. पण, प्रत्यक्षात तो मिळालेला नाही. त्याचा परिणाम महापालिका क्षेत्रातील विकासकामांवर होणार आहे. मूलभूत सुविधा देण्यावर त्याचे तीव्र पडसाद उमटणार असल्याची शक्यता देवळेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. (प्रतिनिधी)राज्य सरकार तर २७ गावांची वाढीव रक्कम आम्हाला अजूनही देत नाही. त्यामुळे एलबीटी आणि मुद्रांक शुल्काचा निधीही सुरळीतपणे द्यावा.  त्यात अडथळे निर्माण करून काय होणार, असा सवाल महापौर देवळेकर यांनी केला.