शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एलबीएस मार्ग रुंदीकरण कारवाई सुरू

By admin | Updated: April 14, 2016 01:29 IST

बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एलबीएस रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

ठाणे : बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एलबीएस रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेऊन त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार, इटर्निटी मॉलसमोर व त्याबाजूची सर्व बाधित बांधकामे तोडण्याची कारवाई सुरू केली. त्याचप्रमाणे तीनहातनाका चौकामध्ये इटर्निटी मॉलच्या बाजूला असलेली वाढीव अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. एलबीएसवरील दोन्ही बाजूंची वाढीव बांधकामे निष्कासित करून त्या ठिकाणी सर्व्हिस रस्त्याचे नियोजन असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या कारवाईमध्ये जवळपास ५५ बांधकामे तोडण्यात आली. त्या वेळी त्यांनी रहेजा कॉम्प्लेक्स ते तीनहातनाका हा रस्ता रुंदीकरण करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजंूची अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश दिले. दरम्यान, कशिश पार्क येथे सुविधा भूखंडावर बांधकाम टीडीआरअंतर्गत ७ मजली इमारत बांधून त्यातील ३ मजले पार्किंगसाठी आणि उर्वरित ४ मजले प्रशासकीय कारणासाठी वापरण्याच्या सूचना त्यांनी शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. हे काम आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यामुळे कशिश पार्क परिसरातील पार्किंगची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. वाघबीळ येथे टीजेएसबी बँक ते विजय गार्डन या कारवाई अंतर्गत एकूण ७० ते ७५ बाधित बांधकामे तोडण्यात आली. यामुळे रस्त्यावर असलेल्या दोन शाळा, दोन मैदाने आणि एक उद्यान येथे जाण्यासाठी प्रशस्त रस्ता मिळणार आहे.