शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेतील नांदिवलीत वाहन पासिंग ट्रॅक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:18 IST

पाच ट्रॅक : वाहनांच्या योग्यतेची होणार तपासणी, प्रशस्त जागेमुळे टळणार वाहतूककोंडी

कल्याण : कल्याण आरटीओ कार्यालयाने पूर्वेतील नांदिवली येथे उभारलेल्या पासिंग ट्रॅकवर वाहन योग्यतातपासणी सोमवारपासून सुरू झाली आहे. कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड तसेच ठाणे परिसरांतील वाहनांची येथे तपासणी होणार आहे. वाहन पासिंग ट्रॅकच्या शुभारंभप्रसंगी आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांच्यासह अन्य अधिकारी डी.एच. लाड, प्रज्ञा अभंग आदी मान्यवर उपस्थित होते. नवीजुनी अशी चारचाकी हलकी वाहने, बस, ट्रक, ट्रेलर या वाहनांची योग्यता तपासली जाणार आहे.

कल्याण आरटीओ कार्यालयास रस्ते सुरक्षा निधीअंतर्गत वाहन फिटनेस टॅÑक तयार करण्यास मंजुरी मिळाली. त्यानंतर, कल्याण पूर्वेतील मलंग रोडवरील नांदिवली परिसरात १० हेक्टर जागेवर वाहन फिटनेसतपासणी ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या वर्षी पावसामुळे हे काम थांबले होते. दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित असतानाही ते झाले नाही. दिवाळीनंतर कामाला गती मिळाल्याने तेथे पाच ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. ट्रॅक बांधणे व इमारतीचा खर्च पाहता दोन कोटी ७१ लाख रुपये या कामावर खर्च होणार आहेत. ट्रॅकचे काम पूर्ण झाले असले, तरी इमारतीचे काम अद्याप बाकी आहे.

वाहन फिटनेसतपासणी ही सरकारच्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार गाडी खरेदी केल्यापासून दोन वर्षांनंतर आणि त्यानंतर दर वर्षाला करणे आवश्यक आहे. सरकारच्या नवीन नियमानुसार वाहनतपासणी आठ वर्षांत दर दोन वर्षांनी करणे बंधनकारक राहणार आहे. वाहनतपासणीसाठी नांदिवली येथे जागा प्रशस्त आहे. त्यामुळे तेथे वाहनांनी नंबर लावल्यास वाहतूककोंडी होणार नाही. मात्र, कल्याण-मलंग रोडवर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली.बांधकाम लवकरचआरटीओचे कार्यालय बिर्ला कॉलेज मागील कोकण वसाहतीत आहे. ही जागा अपुरी पडत असल्याने उंबर्डे येथील सव्वादोन एकर जागेत नवे कार्यालय उभारले जाणार आहे. त्यासाठी १२ कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी १० टक्के रक्कम सरकारने वितरित केली आहे. या रकमेतून तेथे नवीन कार्यालयाच्या कामास लवकरच सुरुवात केली जाणार आहे, असे ससाणे म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली