शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

डोंबिवलीच्या खाडीतून खासगी प्रवासी फेरीबोटचा शुभारंभ

By अनिकेत घमंडी | Updated: May 12, 2018 11:59 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेला लाभलेला विस्तिर्ण खाडी किना-याचा लाभ जलवाहतूकीसाठी प्राधान्याने व्हावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. डोंबिवलीच्या पश्चिमेतून जुन्या डोंबिवली परिसरातून जलवाहतूक करणा-या खासगी बोटीचा शुभारंभ महापौर विनिता राणे यांनी शनिवारी केला.

ठळक मुद्दे महापौर विनिता राणेंची केले उद्घाटन खाडीकिना-यांच्या विकासावर भर

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेला लाभलेला विस्तिर्ण खाडी किना-याचा लाभ जलवाहतूकीसाठी प्राधान्याने व्हावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदींची मोलाची साथ असल्याने तशा पद्धतीने या मार्गाचा विकास जलद होणार आहे, असे मत महापौर विनिता राणे यांनी व्यक्त केले.डोंबिवलीच्या पश्चिमेतून जुन्या डोंबिवली परिसरातून जलवाहतूक करणा-या खासगी बोटीचा शुभारंभ राणे यांनी शनिवारी केला. त्यावेळी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे, सिवकृत नगरसेवक विश्वनाथ राणे, दिपाली पाटील, माजी नगरसेवक पंढरी पाटील यांच्यासह बोट मालक विलास ठाकुर आणि कुटुंबिय उपस्थित होते. डोंबिवली - माणकोली-कल्याण- डोंबिवली अशा मार्गावर ही फेरी बोट खाडीतून मार्ग काढणार आहे. राणे यांच्या माहितीनूसार या बोट वाहतूकीला २५ मे पर्यंत प्रायोगिक तत्वावर सर्व परवानग्या देण्यात आल्या असून त्याची खातरजमा झाल्यावरच महापौरांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. सुमारे 25 ते 50 रुपये असे भाडे प्रती प्रवासी आकारण्यात येणार असून डोंबिवली माणकोलीसाठी सुमारे १० मिनिटे तर कल्याणसाठी २० मिनिटे लागतील, आगामी काळात मुंब्रा भागातही ही प्रवासी फेरी बोट नेण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले. पावसाळयाच्या दिवसात ही सुविधा बंद असते. या परिसरात आधीही एक बोट कार्यरत असून आता ही नवी दुसरी फेरी बोट प्रवाशांसाठी दाखल झाली आहे. या माहापालिकेला लाभलेल्या खाडी किना-याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा. रस्ता वाहतूकीचा वेळ वाचवावा असे आवाहन मोेरे यांनी केले. आगामी काळात या वाहतूकीला मोठी चालना मिळणार आहे. सध्या प्रतीदिन दिडशेहून अधिक नागरिक फेरी बोटीचा लाभ घेतात, नागरिकांची अधिकाधीक सुविधा व्हावी, वेळ वाचावा यासाठी अशा योजनांना पाठबळ मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीmumbraमुंब्रा