शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरांची अखेरची भेट झालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:57 IST

निवृत्तीनंतर सदाशिव गोरक्षकरसर हे वासिंद येथे वास्तव्याला होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या भेटीसाठी मी अधूनमधून येत होते.

कल्याण : निवृत्तीनंतर सदाशिव गोरक्षकरसर हे वासिंद येथे वास्तव्याला होते. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्या भेटीसाठी मी अधूनमधून येत होते. आजही सकाळी कुलाब्याहून वासिंदला जाण्यासाठी गाडी पकडली. कल्याणला गाडी आली तेव्हा फोनवरून मला दु:खद बातमी कळाली की, सरांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांची अखेरची भेट झालीच नाही, अशी खंत ३५ वर्षे गोरक्षकर यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी रवी चाफे यांनी व्यक्त केली आहे.चाफे यांनी सांगितले की, ‘मी १९९३ पासून प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियममध्ये (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) रोजंदारीवर कामाला लागलो. तेव्हापासून गोरक्षकर यांचा माझा संबंध होता. नव्या व जुन्या मुलांना सोबत घेऊन ते काम करत होते. एखाद्या वेळी आमच्या हातून चूक झाली, तर कधीही त्यांनी मला चारचौघांत सुनावले नाही. एकट्याला बाजूला घेऊन ते माझी चूक निदर्शनास आणून देत होते. त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना होता. तो त्यांनी सगळ्यांसाठी खुला केला होता. त्यांनी प्रदर्शने भरविली. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करीत असता देशातील विविध राज्यांत आणि परदेशांत जाण्याची संधी मला मिळाली.’ते पुढे म्हणाले, ‘प्रदर्शनात एखादी वस्तू मांडली असेल तर त्यावर प्रकाश नीट पडला आहे का? की त्यावर सावली पडली आहे का, याचे बारीक निरीक्षण ते करीत होते. त्यातले आम्हाला काही कळत नसताना आमच्याकडून ते पुन:पुन्हा खात्री करून घेत असत. वस्तूवर प्रकाश पडतो आहे का, याची विचारणा करीत. इतका मोठा माणूस आमच्या पातळीवर येऊन काम करीत होता. यातच मला व माझ्या सहकाऱ्यांना मोठेपणा वाटत होता. दरम्यान, त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांना मधूनमधून मी भेटत होतो. आजही त्यांच्या भेटीला निघालो होतो. कल्याणपर्यंत पोहोचलो, तेव्हा त्यांचे निधन झाल्याचे कळले, तेव्हा मला मोठा धक्का बसला. अखेर, त्यांची अखेरची भेट होऊ शकली नाही, याचे शल्य मला कायम राहणार आहे.’>पद्मश्री किताबाने गौरवगोरक्षकर यांच्या काळात म्युझियममध्ये लिफ्ट बसवली गेली. तसेच म्युझियमभोवती संरक्षक भिंत बांधली गेली. भारतातील गोष्टी व म्युझियम जगात नेण्याचे काम सरांनी केले. त्यात त्यांचे वेगळपण होते. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना २००२ मध्ये पद्मश्री किताब देऊन गौरविले होते. हा किताब मिळाल्यावर त्यांच्या वागण्याबोलण्यात व कामात कुठलाही फरक जाणवला नाही.>कुटुंबाचीमोठी हानीगोरक्षकर यांची भाची स्मिता गुप्ते यांनी सांगितले की, त्यांचे नाव खूप मोठे होते. आमच्या कुटुंबात त्यांना पद्मश्री मिळाली, हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब होती. त्यांच्याकडून खूप लोक शिकले. सगळ्यांना त्यांनी ज्ञान दिले. त्याच्या मोबदल्याची अपेक्षा कधीही केली नाही. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.