पालघर : देशाच्या सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा व राज्याच्या सागरी जल क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या सर्व मच्छीमार, खलाशांसाठीही सुरक्षित ठरणारा शासनाचा बायोमेट्रिक कार्ड (ओळखपत्र) देण्याचा महत्त्वपूर्ण व शेवटचा कार्यक्र म सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व मच्छीमारांनी तत्काळ याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश सर्व सहकारी संस्थांना मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त रवींद्र वायडा यांनी दिले आहेत.केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाकडून सागरी मासेमारी नौकांवरील तांडेल, खलाशी, नौकामालक, मच्छीमार आणि इतर संलग्न क्षेत्रातील व्यक्तीच्या मनुष्यबळाच्या माहितीचा उपयोग केंद्र शासनास विविध योजना राबवण्यासाठी होणार असून समुद्रात मासेमारीला जाताना बोटमालक व खलाशांची बायोमेट्रिक ओळखपत्रे नौकेवर ठेवणे केंद्र शासनाने बंधनकारक केले आहे.२६/११ ला मुंबईवर समुद्रीमार्गाने झालेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर शासनाने ही योजना राबवायला घेतली आहे. काही वर्षांपूर्वीपासून ही योजना राबवताना स्थानिक लोकांमधून कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत अनेक अडचणी निर्माण होत असल्याने पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता. पालघर-ठाणे जिल्ह्यातून ७१ हजार बायोमेट्रिक कार्डची नोंदणी करण्यात आली होती. त्यातील ६६ हजार कार्ड वैध ठरले होते.
मत्स्य व्यवसायिकांना ‘बायोमेट्रिक’चा शेवटचा टप्पा
By admin | Updated: July 11, 2016 01:47 IST