शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

गेले वर्षभरात ३८१ पोलिसांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:40 IST

डोंबिवली : कोरोनाच्या प्रादुर्भावात आतापर्यंत कल्याण परिमंडळातील ३४४ पोलीस कर्मचारी आणि ३७ अधिकारी, अशा एकूण ३८१ जणांना ...

डोंबिवली : कोरोनाच्या प्रादुर्भावात आतापर्यंत कल्याण परिमंडळातील ३४४ पोलीस कर्मचारी आणि ३७ अधिकारी, अशा एकूण ३८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर सात जणांना उपचारादरम्यान आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, ३६१ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. यात ३८ अधिकाऱ्यांसह ३२३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत कल्याण- डोंबिवलीत दिवसागणिक वाढ होत आहे. सद्य:स्थितीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर केला आहे. दिवसाला हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. सद्य:स्थितीला रोजच्या मृत्यूंचा आकडा पाच ते सातपर्यंत पोहोचला आहे. आजमितीला बाधितांचा आकडा एक लाख सात हजार ५८४ पर्यंत पोहोचला आहे. यातील ९० हजार ४५ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत, तर एक हजार ३२९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी मार्च ते जून महिन्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेला पहिल्या लॉकडाऊनची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यात परिमंडळ-३ मधील पोलिसांची सर्वांत महत्त्वाची भूमिका राहिली. तपास नाके असोत की रुग्णालयात किंवा क्वारंटाइन सेंटर आणि कंटेन्मेंट झोन, अशा प्रत्येक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून पोलीस आपली जबाबदारी पार पाडताना दिसले. कोरोनाच्या प्रादुर्भावात लॉकडाऊनमध्ये दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून जबाबदारी पार पाडणारे पोलीस नंतरही गणोशोत्सव व नवरात्रौत्सव, अशा सणांमध्येही बंदोबस्तात व्यस्त होते. पोलिसांना जबाबदारी पार पाडताना सोशल डिस्टन्स ठेवता येत नाही, वेळोवेळी लोकांची मदत करावी लागते. त्यासाठी संपर्कातच राहावे लागते. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून आले. कल्याण परिमंडळ-३ चा आढावा घेता आतापर्यंत ३८१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात खडकपाडा, महात्मा फुले चौक, कोळसेवाडी आणि मानपाडा पोलीस ठाण्यांतील पोलिसांची संख्या मोठी आहे. सद्य:स्थितीला दोन कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एक अधिकारी आणि १४ कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये, तर दोन अधिकारी आणि १२ कर्मचारी होम क्वारंटाइन आहेत.

------------------------------------------------------