शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीचे खाजगीकरण?, सुधारण्यास शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 03:01 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम (केडीएमटी) अनेक वर्षे अडचणीत आहे. प्रवाशांना योग्य सुविधा देऊ शकत नसेल, तरी हा उपक्रम चालावा यासाठी पालिका निधी देते. पगार अडले तरी पैसे देते.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा परिवहन उपक्रम (केडीएमटी) अनेक वर्षे अडचणीत आहे. प्रवाशांना योग्य सुविधा देऊ शकत नसेल, तरी हा उपक्रम चालावा यासाठी पालिका निधी देते. पगार अडले तरी पैसे देते. सर्व मदत करुनही अधिकारी परिवहन सेवा सुधारत नसतील, तर त्यांना सुधारण्याची ही शेवटची संधी आहे. अन्यथा परिवहन सेवेचे खाजगीकरण करावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा स्थायी समितीचे सभापती, पहिवहन सदस्य राहुल दामले यांनी बुधवारी दिला.परिवहनच्या सभेत ते बोलत होते. परिवहनचे उत्पन्न वाढावे, नव्या बस रस्त्यावर चालाव्या, प्रवाशांना सोयी-सुविधा मिळाव्या यासाठी परिवहन सदस्य पोटतिडकीने प्रश्न मांडतात. त्यावर प्रशासनाकडून गांभीर्य दाखविले जात नाही. परिवहन उपक्रम वाढीस लागावा, असे एकाही अधिकाºयाला वाटत नाही. त्यांच्याकडून महापालिकेकडे केवळ आर्थिक मदतीसाठी हात पसरले जातात. ती घेऊन रिझल्ट मात्र शून्य दाखविला जातो. परिवहनची सेवा सुधारणार नसेल. केवळ महापालिकेचा निधी लाटला जाणार असेल; तर पालिकेने कशासाठी परिवहन सेवा चालवायची. त्यापेक्षा खाजगीकरण केल्यास प्रवाशांना सेवा तरी उपलब्ध होईल, अशी सरबत्ती दामले यांनी केली. अधिकारी सुधारणार नसतील, तर त्यांच्यासाठी हा निर्वाणीचा इशारा असेल. या इशाºयानंतरही सुधारणा न झाल्यास केडीएमटीचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव परिवहनच्या सभेत आणला जाईल, असे दामले यांनी स्पष्ट केले. दामले यांच्या मुद्द्याला सदस्यांनी दुजोरा दिला. सदस्य नितीन पाटील यांनी तर तातडीने खाजगीकरण करा आणि परिवहन समितीच बरखास्त करा, अशी मागणी उचलून धरली.पालिका शाळेतील विद्यार्थ्याना मोफत प्रवासाची सवलत दिली जावी, ४० टक्के अपंग असलेल्या दिव्यांगांसह अंध, मतिमंद, मूकबधीर, कुष्ठरोगी यांना मोफत प्रवास पास देण्यात यावा, असे प्रस्ताव सदस्य संतोष चव्हाण व मनोज चौधरी यांनी मांडले. मात्र त्यामुळे परिवहनला किती आर्थिक बोजा सहन करावा लागेल, याचा आकडा काढा. अन्य पालिकांच्या परिवहन उपक्रमात कशाप्रकारे ही सवलत आहे, तसेच सवलतीबाबत सरकारी जीआर काय आहे. याची तपासणी करुन प्रस्ताव नव्याने मंजुरीसाठी मांडू, असे उपायुक्त सुरेश पवार यांनी स्पष्ट केले. पालिका शाळेत १० हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. दिव्यांगाची संख्या जवळपास ६५ हजार इतकी आहे. कुष्ठरूग्णांचा आकडाही हजारोंच्या घरात आहे. त्याचा विचार करुन पालिकेच्या अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी असलेल्या निधीचा विचार यासाठी केला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.>डिझेलचा प्रस्ताव स्थगितपरिवहन उपक्रम सुरु झाला तेव्हापासून केडीएमटी इंडियन आॅईल कंपनीकडून दिवसाला २० हजार लीटर डिझेल खरेदी करते. त्यात कंपनीकडून सात हजार ६०० रुपयांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे महिन्याला परिवहनचे ४२ हजार रुपये वाचू शकतात. मात्र हा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने तो अभ्यास करून नव्याने पुढील सभेत मांडावा. तूर्तास हा प्रस्ताव स्थगित ठेवावा, असे सदस्यांनी सांगितल्याने तो स्थगित ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका