सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ( महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब ) यांनी कागदाच्या आकाश कंदिलाच्या माध्यमातून गणपतीची आरास केली आहे . विशेष म्हणजे ही आरास विश्वास गतीमंद संस्थेतील २५ मुलांच्या चमूची मदत घेऊन केल्याचे मंडळाने सांगितले. यंदा मंडळाचे ४२ वे वर्ष आहे. यंदा कागदी कंदिलाचा काल्पनिक महाल केला असून यात १०१ एलएडी दिव्यांची रोषणाई करत वीज बचतीचा संदेश दिला आहे. या सजावटीसाठी लहान - मोठे असे विविधरंगी २०० हून अधिक आकाश कंदील वापरले आहेत. त्यांचा वापर करण्याचे प्रमुख कारण म्हणजे कंदील हा प्रकाशचा स्त्रोत आहे. आजूबाजूचे वतावरण सतत तेजोमय रहावे असा संदेश देण्यासाठी हा महल उभारला आहे. या मखराची उंची १४ मीटर असून लांबी २० मीटर इतकी आहे. मखर ईको फ्रेंडली असल्याने यासाठी वापरलेले कंदील परिसरातील नागरिकांना अनंत चतुर्दशीनंतर रास्त किंमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . याच मुलांनी पाच वर्षांपूर्वी शैक्षणिक साहित्य वापरून सर्व शिक्षण अभियानाचा संदेश दिला होता. विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या कलागुणांना संधी द्यावी, या उद्देशने या मुलांना मंडळाने प्रोत्साहन दिले आहे. ही मुले वेगळे काहीही करू शकतात आणि आपल्यातल्या कलागुणांच्या आधारावर ताठ मानेने समाजात जगू शकतात अशी स्फुर्ती त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी विश्वास संस्थेशी संपर्क साधल्याची माहिती मंडळाचे सजावट प्रमुख संजय भोईर यांनी दिली .
कंदील महालाची आरास; आयुष्याची तेजोमय सुरुवात
By admin | Updated: September 23, 2015 04:01 IST