शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाटात भुस्खलन सुरूच; दगड - माती हटवण्यात पावसाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 19:37 IST

रस्त्यावरील दगड-माती हटवण्याचे काम माळशेज घाटातील छत्री पॉर्इंट या ठिकाणी सुरू आहे. घाटातील या ठिकाणाची केएम ९१/०० एनएच ६१ अशी नोंद केलेली आहे. या ठिकाणचे काम शुक्रवारीदेखील पावसाचा आंदोज घेऊन करावे लागेल. आतापर्यंत छोटी गाडी पास होईल, असा रस्ता मोकळा झाला. शुक्रवारी तो पूर्ण मोकळा होण्याची अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनैसर्गिक अपत्तीत खबरदारीची उपाययोजना म्हणून काही दिवस घाट बंद रस्त्यावरील दगड-माती हटवण्याचे काम माळशेज घाटातील छत्री पॉर्इंट या ठिकाणीकोसळलेल्या दरडीचा काही भाग डोंगराच्या सुळक्यावर अडकला

ठाणे / टोकावडे : माळशेजघाटातील रस्ता गुरुवारी संध्याकाळपर्यंत  मोकळा होईल, अशी अपेक्षा होताी. परंतु, पावसाचा जोर आणि धुके यामुळे कामात व्यत्यय येत आहे. याशिवाय डोंगर माथ्यावरून भूस्खलन सुरूच आहे. यामुळे मोठमोठे दगड निखळण्याची भीती आहे. तरीदेखील रस्त्यावरील ७० टक्के दगड- माती गुरुवारी हटवण्यात आली. मात्र, नैसर्गिक अपत्तीत खबरदारीची उपाययोजना म्हणून काही दिवस घाट बंद ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत.दाट धुके आणि पाऊस यामुळे रस्त्यावरील मातीचा खच उचलण्यास अडथळा येत आहे. या ठिकाणी दोन मशीन्स दगड, माती हटवण्याचे काम करीत आहेत. डोंगरकड्यावरून दगड - माती निखळत तर नाही ना, याचा आंदोज घेऊनच काम करावे लागत आहे. तरीदेखील एक गाडी जाईल, एवढा रस्ता गुरुवारी मोकळा झाला. रस्त्यावर १०० मीटर पेक्षा अधिक असलेला मातीचा खच सुमारे ७० टक्के हटवला. शुक्रवारी तो मोकळा होण्याची शक्यता आहे. परंतु, बुधवारी कोसळलेल्या दरडीचा काही भाग डोंगराच्या सुळक्यावर अडकला आहे. तो खाली पडल्यानंतर पुन्हा रस्त्यावर दगड माती होईल. गुरूवारी सायंकाळपर्यंत भर पावसात काम जीव धोक्यात घालून करावे लागल्याचे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी सांगितले.रस्त्यावरील दगड-माती हटवण्याचे काम माळशेज घाटातील छत्री पॉर्इंट या ठिकाणी सुरू आहे. घाटातील या ठिकाणाची केएम ९१/०० एनएच ६१ अशी नोंद केलेली आहे. या ठिकाणचे काम शुक्रवारीदेखील पावसाचा आंदोज घेऊन करावे लागेल. आतापर्यंत छोटी गाडी पास होईल, असा रस्ता मोकळा झाला. शुक्रवारी तो पूर्ण मोकळा होण्याची अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली.*रस्ता एक दिवस अंडर कंट्रोल ठेवणाररस्ता मोकळा झाल्यानंतरही वाहकाच्या जिवीतास धोका होऊन नये यासाठी सुमारे एक दिवसाकरीता रस्ता ‘अंडर कंट्रोल’ ठेवावा लागेल. त्यानंतर घाटातील वाहतूक सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय घ्यावा लागेल. सुळक्यावरून खाली दगड येताच आम्हाला पळतच छत्री पॉर्इंटवर येऊन थांबावे लागत आहे. नैसर्गिक आपत्ती आहे, त्यासंदर्भातील निर्णय घाईगर्दीत घेणे योग्य होणार नाही, असे मुरबाडचे पोलीस निरिक्षक डी. सी. पोरे यांनी लोकमतला सांगितले.मंगळवारी पहाटे या घाटात दरड कोसळून एक टेम्पो चालक जखमी झाला. मात्र, टेम्पोचा चक्काचूर झाला. आजच्या तिसऱ्या दिवशीदेखील रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे .पावसाचा जोर पाहून ते अधून मधून बंद करावे लागत आहे. डोंगराच्या सुळक्यावर आडकलेले दगड कोसळून जिवीत हाणी होऊ नये म्हणून अंदाजे दोन दिवस तरी वाहतूक बंद ठेवावी लागणार असल्याचे आमच्या स्थानिक टोकावडे वार्ताहराने कळवले आहे...............फोटो - २३ठाणे माळशेज घाटात केलेला मोकळा रस्त्या

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी