शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीच्या शिडीचा भाग तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:42 IST

भिवंडी : तौक्ते चक्रीवादळामुळे भिवंडीत सोमवारी सकाळपासून जोरदार सोसाट्याचा वारा व पावसाने हजेरी लावली होती. वादळवारा व पावसामुळे शहरात ...

भिवंडी : तौक्ते चक्रीवादळामुळे भिवंडीत सोमवारी सकाळपासून जोरदार सोसाट्याचा वारा व पावसाने हजेरी लावली होती. वादळवारा व पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळल्याची, घरांच्या छतांचे पत्रे फुटल्याच्या घटना घडल्या. शहरातील पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या २० दशलक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या शिडीचा वरचा भाग तुटून पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कुठलीही हानी झाली नाही. मात्र या पाण्याच्या टाकीची सध्या दयनीय परिस्थिती झाल्याने मनपा प्रशासन या पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी उपस्थित केला आहे.

भिवंडी पालिका कार्यक्षेत्रात आय.जी.एम. रुग्णालयशेजारी पालिकेने सुमारे ४० वर्षांपूर्वी २० दशलक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. या टाकीतून भिवंडी पूर्व विभागातील कार्यक्षेत्रात जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत असतो. या पाण्याच्या टाकीची निगा व दुरुस्ती न राखल्याने व वेळोवेळी तिची डागडुजी न केल्याने सध्या टाकीची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे. टाकीच्या स्लॅब व खांबांना चिरा पडलेल्या असून, काही ठिकाणी स्लॅबचे प्लॅस्टरही निखळून पडले आहे. त्यातच सोमवारी या टाकीची काँक्रीट शिडीचा काही भाग तुटल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी आता तरी लवकरात लवकर या टाकीची दुरुस्ती मनपा प्रशासनाने करावी, अशी मागणी नगरसेवक अरुण राऊत यांनी केली आहे.