शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये शिक्षकांचीही कमतरता

By admin | Updated: July 20, 2015 03:15 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये सोयीसुविधांअभावी विद्यार्थी पटसंख्या घटत असताना दुसरीकडे शिक्षकही अपुरे आहेत.

प्रशांत माने , कल्याणकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये सोयीसुविधांअभावी विद्यार्थी पटसंख्या घटत असताना दुसरीकडे शिक्षकही अपुरे आहेत. यामुुळे काही शाळांमध्ये दाटीवाटीने विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण दिले जात असल्याने एक प्रकारे शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.केडीएमसीच्या ७४ शाळांपैकी ९ शाळा पटसंख्येअभावी बंद कराव्या लागल्या आहेत. उर्वरित ६५ शाळांमध्ये सद्य:स्थितीला ११ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिकतात.शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षकांचे प्रमाणही योग्य असणे गरजेचे आहे. शिक्षकांची ३९२ पदे मंजूर केली आहेत. परंतु, आजघडीला यातील केवळ २७४ पदेच भरली आहेत. अद्याप ११८ पदे रिक्त आहेत.माध्यमांचा विचार करता मराठी माध्यमाच्या ५१ शाळांसाठी २९२ पदे मंजूर असून त्यातील २१४ पदे भरली आहेत. हिंदी माध्यमाच्या ३ शाळांसाठी ३५ पदे मंजूर आहेत. मात्र, २२ शिक्षकच सध्या कार्यरत आहेत, तर ९ उर्दू शाळांसाठी ६५ पदे मंजूर असली तरी ३८ पदेच भरली आहेत. शिक्षकांच्या कमतरतेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून बल्याणी येथील बंदेअली खाँ शाळा याचे ताजे उदाहरण आहे. येथे शिक्षक अपुरे पडत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात दाटीवाटीने बसवून शिकविले जात आहे. विशेष बाब म्हणजे पदवीधर शिक्षक पदे ही भरलेली नाहीत. मागील वर्षी नियमाप्रमाणे ती भरणे आवश्यक होते. परंतु, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. यासंदर्भात प्राथमिक शिक्षक संघटनेचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, शिक्षण मंडळाचे ती भरण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. पदे भरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.