शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील सराफाला घातला लाखाचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 06:19 IST

महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शोरूममधील संतोष थेराडे व तुषार मोरे हे दोन कर्मचारी एक लाखाचे सुटे घेऊन तांबे यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले.

ठाणे : शहरातील प्रसिद्ध सराफाला एका महिलेने फोन करून डॉक्टर बोलत असल्याची बतावणी केली. सोन्याच्या पाटल्या खरेदी करायच्या आहेत. त्यासाठी माप घ्यायला माणसांना पाठवा, असे सांगितले. तसेच त्यांच्याबरोबर सुटे पैसे हवे असल्याचे सांगून सोबत एक लाख रूपये सुटे पाठवून द्या, असेही सांगितले. त्यानुसार ती रक्कम घेऊन एक जण पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.ठाणे रेल्वे स्टेशन परिसरालगत नौपाड्यात वामन हरी पेठे सन्स हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे शोरूम आहे. याच शोरूमच्या पहिल्या मजल्यावर तांबे हॉस्पिटल आहे. शुक्रवारी दुपारी वामन हरी पेठे सन्स या शोरूममधील लॅण्डलाइन क्र मांकावर एका अनोळखी महिलेने फोन केला. तिने मी डॉक्टर स्वाती तांबे बोलत असल्याचे सांगितले. मला सोन्याच्या पाटल्या खरेदी करायच्या आहेत, त्यासाठी माप घ्यायला माणसे पाठवा, अशी बतावणी केली. याचवेळी फोनवरून बोलणाऱ्या त्या अनोळखी महिलेने एक लाखाचे सुटे पैसेही दवाखान्यात हवे आहेत, ते देखील पाठवा, असे सांगितले.महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शोरूममधील संतोष थेराडे व तुषार मोरे हे दोन कर्मचारी एक लाखाचे सुटे घेऊन तांबे यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. त्याचवेळी तेथे असलेल्या एका तरु णाने दोघांना मी तांबे यांचा मुलगा आहे. पैसे माझ्याकडे द्या, असे त्याने सांगितले. त्यानंतर तो पैसे घेऊन पसार झाला. काही वेळानंतर फोन करणारी महिला ही स्वाती तांबे नव्हती आणि पैसे घेणारादेखील त्यांचा मुलगा नसल्याचे उघड झाले. त्यामुळे शोरूममधील कर्मचारी श्रीकांत अधिकारीदेसाई यांनी नौपाडा पोलिसात धाव घेऊन याप्रकरणी तक्र ार दिली.

टॅग्स :Robberyदरोडा