शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कासा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता

By admin | Updated: November 7, 2016 02:41 IST

या तालुक्यातील डहाणू कॉटेज रुग्णालय आणि कासा उपजिल्हा रुग्णालय या प्रमुख रुग्णालयातील डॉक्टरांची

शौकत शेख, डहाणूया तालुक्यातील डहाणू कॉटेज रुग्णालय आणि कासा उपजिल्हा रुग्णालय या प्रमुख रुग्णालयातील डॉक्टरांची, टेक्निशियन्सची रिक्त पदे, प्रतिनियुक्तीवरील नियुक्ती तसेच नादुरुस्त रुग्णवाहीका यामुळे डहाणूची आरोग्य सेवा सलाईनवर आहे.पालघर विधानसभेचे आमदार अमित घोडा यांनी शुक्र वारी कासा उपजिल्हा रु ग्णालयाची पाहणी केली. त्यामध्ये रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, रुग्णवाहिका, प्रतिनियुक्तीवर गेलेले वैद्यकीय अधिकारी, या विषयावर डॉ. प्रसाद तरसे, डॉ मुकणे यांच्याशी चर्चा केली आदिवासी गोरगरीब जनतेला आवश्यक वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी मिळवून देण्याबाबत सूचना केल्या. यावेळी कासा सरपंच रघुनाथ गायकवाड, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आप्पा भोये, डहाणू तालुका प्रमुख संतोष वझे, चारोटी उपसरपंच प्रणय मेहेर, महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख, उपस्थित होते.कासा उपजिल्हा रुग्णालयाला एकूण ८ आरोग्य केंद्र जोडण्यात आलेली आहेत. महामार्गालगतच्या या उपजिल्हा रुग्णालयाला एकूण ३ रु ग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. मात्र त्यापैकी २ नादुरुस्त आहेत. एकाच रुग्णवाहिकेवर भार आहे. त्यामुळे नजिकच्या सोमटा केंद्रात असलेली रुग्णवाहिका कासा उपजिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. कासा येथे वाहनचालक हे पद मंजूर नाही. कंत्राटी पद्धतीने ५ कामगार काम करीत असून त्यांचेही वेतन वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे कासा येथे इमारती आहेत. पण डॉक्टरांअभावी रूग्णसेवा सलाईनवरच आहे. कासा उपजिल्हा रुग्णालयाला जनरल सर्जन नाही त्यामुळे एकही शस्त्रक्र ीया होत नसल्याने ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा म्हणण्याची वेळ आली आहे.डहाणूच्या दोन्ही रुग्णालयात मोठ्या आजारांवर शस्त्रक्र ीया होत नाहीत. दाखल केलेल्या रुग्णांना सिल्व्हासाचे विनोबा भावे रुगणालय किंवा बापू रूग्णालयात नेण्यात येते. त्यामुळे डहाणू, कासा येथील रूग्णालये असून अडचण नसून खोळंबा असे म्हणण्याची वेळ आली आहे.