शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

गौरकामथ पशुवैद्यकीय दवाखान्यात मूलभूत सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:53 IST

कर्जतपासून जवळच असलेल्या गौरकामथ येथे २००९-१० मध्ये सुमारे १० लाख रुपये खर्च करून रायगड जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने पशुवैद्यकीय दवाखाना उभारला.

नेरळ : कर्जतपासून जवळच असलेल्या गौरकामथ येथे २००९-१० मध्ये सुमारे १० लाख रुपये खर्च करून रायगड जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने पशुवैद्यकीय दवाखाना उभारला. मात्र खेदाची बाब म्हणजे दवाखान्याला अधिकृत वीजपुरवठाच केलेला नाही. परिणामी फ्रीज बंद असल्याने लसी थंड वातावरणात ठेवणे शक्य होत नाही. तसेच पाणीपुरवठाही नसल्याने येथील पशुवैद्यकीय अधिकाºयांना काम करणे गैरसोईचे होत आहे.कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. या शेतीला पूरक म्हणून गाई, म्हशी, बकºया, पाळून दुग्धव्यवसाय केला जातो. तसेच कुक्कुटपालनाचाही व्यवसाय करतात. या जनावरांना सुध्दा विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. अशा आजारी जनावरांवर तातडीने पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार होणे गरजेचे आहे. या जनावरांना होणारे साथीचे तसेच अन्य आजारांवर उपचार म्हणून लसीकरण करण्यात येते.शासनातर्फे अत्यंत माफक दरात लस उपलब्ध होते. लस थंड वातावरणात ठेवण्याची आवश्यकता असल्याने दवाखान्यात फ्रीज आहे, परंतु कित्येक महिन्यांपासून वीजपुरवठा नसल्याने हा फ्रीज बंद आहे. त्यामुळे तात्पुरता उपाय म्हणून या लसी संबंधित कर्मचारी आपल्या घरी ठेवतात, असे कर्मचाºयांनी सांगितले.येथे पशुधन विकास अधिकारी पदावर डॉ. एस. डी. भोसले कार्यरत आहेत. जनावरांना होणाºया आजारांमध्ये पोटफुगे, जुलाब, गोचिडाचा प्रादुर्भाव, घटसर्प, लाळ खुटकत, कोंबड्यांची मानमोडी, लासोटा, देवी आदी रोग होतात, अशी माहिती दिली.डॉ. भोसले यांच्याकडे गौरकामथव्यतिरिक्त खालापूर तालुक्यातील जांभूळपाडा येथीलही जबाबदारी त्यांच्यावर असल्याने गौरकामथ पशुवैद्यकीय दवाखान्यात ते जास्त उपस्थित राहू शकत नाहीत. यामुळे शेतकºयांचीही गैरसोय होत आहे.याचप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सभोवताली संरक्षक भिंत नसल्याने आणि वीजपुरवठा नसल्याने रात्रीच्या वेळेस त्या दवाखान्यात तळीरामांची मैफल जमते. येथे रात्रीच्या वेळेस कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने या तळीरामांचे आयतेच फावते. जनावरांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात स्टॅण्ड उभे करण्यात आले आहे, परंतु त्यावरही शेड नसल्याने पावसाळ्यात उपचार करण्यास समस्या जाणवते.

टॅग्स :Raigadरायगडhospitalहॉस्पिटल