शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जादूटोण्याच्या संशयातून केली काकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:28 IST

शिरविरहित शवाची उकल : आरोपीस अटक

मुंब्रा : तीन वर्षांपूर्वी काकाने केलेल्या जादूटोण्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयाने पछाडलेल्या पुतण्याने मित्रांच्या साहाय्याने काकाची हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. त्याने काकाचे धड आणि शिर वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते. दोन दिवसांपूर्वी दहिसर मोरी भागातील ठाकूरपाडा येथील डोंगराळ भागात शिरविरहित शव आढळले होते.या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपी पुतण्या आणि त्याच्या मित्राला २४ तासांमध्ये अटक केली. आरोपीने ज्याची हत्या करण्यात आली, त्याचे नाव विष्णू नागरे असल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४ जवळील पिंपरी गावात ते राहत होते. त्यांचा भाऊ कृष्णा यांचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू विष्णू यांनी केलेल्या जादूटोण्यामुळे झाल्याचा संशय कृष्णा याचा मुलगा अमित नागरे याला होता. यातूनच त्याने विष्णू नागरे यांना मद्यप्राशन करण्याच्या निमित्ताने ठाकूरपाडा परिसरातील एका दगडखाणीमागे नेले. तिथे अमितने त्यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी अमित आणि त्याचा मित्र अमर शर्मा याला अटक केली असून, दिवा डम्पिंग ग्राउंडमध्ये फेकलेले शिर ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडात सामील असलेल्या इतर तिघांचा शोध सुरु आहे. विष्णू यांच्या पत्नीने पती हरवल्याची तक्रार शीळ-डायघर पोलिसांना दिली होती. त्यानंतर तपासाला वेग येऊन, २४ तासांत या प्रकरणाची उकल झाली.

टॅग्स :Murderखून