शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंद, डोहाळे ग्रामपंचायती भाजपाकडे, भादाणे सेनेकडे

By admin | Updated: November 14, 2015 23:52 IST

भिवंडी तालुक्यातील कुरुंद व डोहाळे या गोडाऊन पट्ट्यातील ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश आले आहे.

पडघा : भिवंडी तालुक्यातील कुरुंद व डोहाळे या गोडाऊन पट्ट्यातील ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन करण्यात भाजपला यश आले आहे. मात्र, भादाणे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.कुरुंद ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाकरिता शिवसेना व भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. महिलांकरिता आरक्षित असलेल्या सरपंचपदाकरिता श्रेया गायकर तर उपसरपंचपदाकरिता नीळकंठ विशे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. ऐन वेळेस अपक्ष उमेदवारांना भाजपाने आपल्याकडे वळविल्यामुळे गायकर यांची सरपंचपदी तर विशे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी पी.डी. सासे यांनी घोषित केले. डोहाळे ग्रामपंचायतीमध्ये सत्तासंघर्ष पाहावयास मिळाला. शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार असलेल्या दर्शना दत्तात्रेय ठाकरे यांना ऐनवेळेस उमेदवारी नाकारल्याने ठाकरे यांच्यासमवेत शिवसेनेच्या एका गटाने सरपंचपदाची उमेदवारी दाखल करण्याच्या काही वेळ अगोदरच भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाकडून त्यांना थेट सरपंचपदाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्यात आले. मात्र, ऐनवेळेस आपल्यामधील एका गटाने भाजपात प्रवेश केल्याने सत्तेजवळ असलेल्या शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळच न उरल्याने ठाकरे यांची सरपंचपदी तर दानीश शेख यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. भादाणे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविल्याने शिवसेनेच्या सुनीता सुभाष कथोरे यांची सरपंचपदी तर हनुमान गीते यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.