शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

भाजपावर कुरघोडी

By admin | Updated: January 23, 2017 05:36 IST

मालमत्ता करात माफी, पालिकेचे स्वत:चे धरण, सेंट्रल पार्क अशा ठाण्यासाठीच्या वचननाम्यातील मुद्दयांची घोषणा जरी शिवसेनेने

ठाणे : मालमत्ता करात माफी, पालिकेचे स्वत:चे धरण, सेंट्रल पार्क अशा ठाण्यासाठीच्या वचननाम्यातील मुद्दयांची घोषणा जरी शिवसेनेने केली असली, तरी त्यातील मोजक्या बाबी वगळता उर्वरित मुद्दे म्हणजे पालिकेच्या मार्गी लागलेल्या योजना आणि वचननाम्यातील आधीच्या योजनांनाच नवा मुलामा चढवल्याचे दिसून आले. पालिकेच्या प्रकल्पांचे श्रेय भाजापाने घेऊ नये यासाठी त्यांचा वचननाम्यात समावेश करून शिवसेनेने कुरघोडी केल्याचे स्पष्ट झाले.मुंबईप्रमाणेच ठाण्यातही शिवसेना मालमत्ता करात सवलत देऊ शकते, हा मुद्दा ‘लोकमत’ने मांडला होता. पक्षात सुरूवातीला ३०० चौरस फुटांच्या घरांच्या सवलतीचा मुद्दा होता. मात्र मुंबईनुसार घरांचा आकार पक्षप्रमुखांच्या चर्चेवेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढवल्याचे कळते. पुढे त्यात उल्हासनगरचाही समावेश करण्यात आला.मात्र या लोकानुनयी सवलतींमुळे पालिकेच्या उत्पन्नवाढीच्या प्रयत्नांना खीळ बसेल. त्यामुळे एकतर जीएसटीच्या उत्पन्नातून पालिकेला अधिक वाटा मिळवावा लागेल किंवा ठाणे-उल्हासनगरवासीयांवर नवा कर आकारून ही सवलतींची तूट भरून काढावी लागेल, असे पालिका अधिकारी आणि नगरविकास तज्ज्ञांचे म्हणणे आहे.ठाण्यात जकात बंद झाल्यानंतर एलबीटी आली आणि आता त्याजागी जीएसटी येणार आहे. जकात रद्द झाल्यावर पालिकेचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार पालिकेने मालमत्ता करवाढीचे पाऊल उचलले. त्यातून उत्पन्नवाढीचे लक्ष्य पालिकेने ठरविले असतानाच सत्तारूढ शिवसेनेने मात्र सवलतींचा वर्षाव केल्याने आर्थिक शिस्तीचा खीळ बसण्याची भीती आहे. ठाणेकरांना दिलासा देण्यासाठी ५०० फुटांपर्यंत कार्पेट एरिया असणाऱ्या घरांना मालमत्ताकरापासून मुक्ती देण्याची घोषणा शिवसेनेने वचननाम्याच्या माध्यमातून केली. मुंबईप्रमाणेच ठाणे आणि उल्हासनगर येथेही मालमत्ताकरात सवलत देण्याची घोषणा करताना या दोन्ही शहरांमध्ये बाळासाहेब ठाकरे आरोग्यकवच योजनादेखील लागू करण्यात येणार आहे. ठाणेकरांच्या हक्काचे धरण बांधण्याचेही पुन्हा एकदा जाहीर केले आहे.ठाण्यातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ताकरातून वगळल्यामुळे छोटी घरे असलेला कनिष्ठ मध्यमवर्ग, मध्यम वर्ग आणि काही प्रमाणात उच्च मध्यमवर्गाची सहानुभूती मिळवण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. ५०१ ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरात राहणाऱ्यांना मालमत्ताकरात सवलत देण्याची आणि ७०१ चौरस फुटांवरील घरे असलेल्या गृहसंकुलांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन यासारखे पर्यावरणस्नेही विशेष उपक्रम राबवल्यास त्यांनाही मालमत्ताकरात विशेष सवलत देण्याची घोषणा शिवसेनेने रविवारी केली. (प्रतिनिधी)