शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उत्साह-दिमाखात रंगली कौपिनेश्वर स्वागतयात्रा

By admin | Updated: April 9, 2016 02:18 IST

रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोलताशांचा गजर, भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले ठाणेकर, मित्रमैत्रिणींसोबत सेल्फीचा आनंद लुटणाऱ्या तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

ठाणे : रांगोळ्यांच्या पायघड्या, ढोलताशांचा गजर, भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले ठाणेकर, मित्रमैत्रिणींसोबत सेल्फीचा आनंद लुटणाऱ्या तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध चित्ररथांच्या माध्यमातून पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी हेच जीवन, जल है तो कल है... अशा घोषवाक्यांतून केलेली जनजागृती असे उत्साही वातावरण पाहायला मिळाले ते शुक्रवारी ठाण्यातील कौपिनेश्वरच्या नववर्ष स्वागतयात्रेत... ‘शांताबाई..., आवाज वाढव डीजे..., पिंगा गं पोरी पिंगा...’ अशा एकापेक्षा एक हिट गाण्यांवर अंगणवाडीसेविकांनी जल्लोषात सादर केलेल्या नृत्याने यंदाच्या स्वागतयात्रेत वेगळीच रंगत आणली.श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने निघालेल्या स्वागतयात्रेचे यंदाचे १५ वे वर्ष होते. पहाटे कौपिनेश्वराची विधिवत पूजा केल्यानंतर मासुंदा तलाव येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुहास बाकरे हे स्वागताध्यक्षपदी होते. जांभळीनाका येथील रंगो बापूजी गुप्ते चौकात पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी खासदार राजन विचारे, नगरसेवक रवींद्र फाटक, नरेश म्हस्के, भाजपा ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, न्यासाचे अध्यक्ष मा.य. गोखले, विश्वस्त सुधाकर वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. स्वयंभू संस्कृती वाद्य पथकाच्या सादरीकरणावर उपस्थितांनीही ठेका धरला. महिलांची बाइकवरून निघालेली रॅली स्वागतयात्रेच्या सुरुवातीला पाहायला मिळाली. नारी शक्ती ब्रिगेड, विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट, घंटाळी मित्र मंडळ, पर्यावरण दक्षता मंच, जैन मंदिर ट्रस्ट टेंभीनाका, ठाणे तेली समाज, ठाणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग आणि मराठा मंडळ यांनी आपल्या चित्ररथांतून ‘पाणी वाचवा, पाणी साठवा’चे संदेश दिले. सरस्वती क्रीडा संकुलच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके सादर केली. माथाडी व्यापारी सामाजिक संस्थेच्या वतीने दुचाकीवर तिरंग्याच्या रंगाच्या गुढ्या बाइकवर उभारल्या होत्या. तर, मागे नंदीची प्रतिकृतीदेखील पाहायला मिळाली. रानवाटा संस्थेच्या चित्ररथातून छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचे दर्शन ठाणेकरांना घडले. मोरया ग्रुपची इको-फ्रेण्डली पंढरीची वारी बघ्यांचे आकर्षण ठरली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या, तर देवरुखे ब्राह्मण संघाने आपल्या चित्ररथावर ‘सहिष्णूतेचे आपण पाईक होतो आणि राहू या’ असा संदेश दिला. भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाने तारपा नृत्य सादर करून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. कऱ्हाडे ब्राह्मण संघाने मी तुझा सांगाती, या विषयावरील चित्ररथांतून मोबाइलचे महत्त्व पटवून दिले. सारा फाउंडेशनने हेल्मेट वापरा अपघात टाळा, या विषयावर जनजागृती केली. थाना माहेश्वरी समाज, ठाणे शिर्डी वारकरी प्रतिष्ठान, विद्याभवन वसतिगृह, भिवंडी व शारदा विद्यामंदिराची मुले, आदर्श प्रतिष्ठान यांनीदेखील स्वागतयात्रेत सहभागी होण्याचा आनंद लुटला. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी विविध सेवाभावी संस्थांनी पाणी, सरबत तसेच काही खाद्यपदार्थांचे मोफत वाटप केले. स्वागतयात्रेदरम्यान काही महिलांनी फुगड्या घातल्या. काही ठिकाणी गणेशाची आरतीदेखील सुरू होती. त्यामुळे स्वागतयात्रेतील वातावरण मंगलमय झाले होते. अंगणवाडीसेविकांनी केलेल्या नृत्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दादच नाही, तर प्रत्यक्षात भेटून त्यांची प्रशंसाही केली. राममारुती रोड येथे स्वागतयात्रेत सहभागी होण्यासाठी आणि पाहण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. बहुतेक मुले झब्बा-पायजमा, जॅकेट अशा मराठमोळ्या वेशात पाहायला मिळाली. तर, मुलींमध्ये कुणी पंजाबी ड्रेस तर कुणी साडी नेसून स्वागतयात्रेत सहभागी झाल्या होत्या. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत तरुणाईने सेल्फी विथ स्वागतयात्रेचा आनंद लुटला.