शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कोपरी पुन्हा खाजगी बसेसच्या वाहतुकीने गजबजले, कारवाईचा केवळ फार्सच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 15:51 IST

खाजगी बसेसवर कारवाईचा बार हा फुसकाच असल्याचा प्रत्यय समोर आला आहे. कोपरीत बंद झालेल्या या बसेस पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे परिवहन प्रशासन, आरटीओ आणि वाहतुक पोलीस एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघत आहेत की काय, असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

ठळक मुद्देखाजगी बसवर कारवाईचा केवळ फार्सगुन्हे दाखल करण्यात कुचराई

ठाणे - एकीकडे खाजगी बसेसचा मुद्दा वारंवार परिवहन समितीच्या बैठकीत गाजत असतांना आणि या बसेसवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन परिवहन प्रशासनाने दिले आहे. परंतु परिवहन, आरटीओ आणि वाहतुक पोलिसांच्या नाकावर टिच्चुन खाजगी बसेसने पुन्हा कोपरीत आपले पाय पसरले असल्याचे दिसत आहे. पुन्हा कोपरी या बसेसने गजबजून गेले आहे.              ठाणे पुर्व भागातील सिद्धार्थ नगर ते हसीज कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा खासगी बस गाड्यांची रेलचेल गेल्या अनेक वर्षांपासुन सुरु आहे. यामुळे या परिसरात सकाळ व संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला कोपरीकरांना सामोरे जावे लागत होते. या ठिकाणाहून ठाणे महापालिका परिवहन विभागाची बससेवा सुरळीत व पुरेशा प्रमाणात नसल्याने शहराच्या बाह्य भागातून ठाणे स्थानकापर्यंत बेकायदा प्रवासी वाहतूक करणाºया खासगी बसेसची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या बसेस सर्वाधिक घोडबंदर ते ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात हसीज कॉर्नर पर्यंत येत असतात. यामुळे सिध्दार्थ नगर ते हसिजा कॉर्नर परिसारात होणाऱ्या  वाहतुक कोंडीमुळे कोपरीकरांना ५ ते १० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी २० मिनिटे वाहतुक कोंडीत घालवावी लागत होती. दरम्यान, एका ज्येष्ठ नागरिकाच्या अपघातानंतर कोपरीवासीयांनी एकत्र येऊन या बसेसच्या विरोधात एल्गार पुकारला होता. तसेच कोपरी बंदची हाक देखिल देण्यात आली होती. स्थानिकांचा तीव्र विरोध पाहून अखेर पोलिसांनी या बस चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला. घोडबंदर येथून येणाऱ्या खासगी बसेस व कंपनीच्या बसेस बारा बंगला येथे थांबविण्यात येत आहेत. त्यामुळे बारा बंगला येथे कारवाईला सुरु वात केली होती. यामुळे काही दिवस या परिसरातील खासगी बेकायदा प्रवासी वाहतुकीला काही अंशी ब्रेक लागल्याने कोपरीकरांची वाहतुक कोंडीतुन सुटका झाली होती.दरम्यान, परिवहनच्या बसथाब्यांवरुन खाजगी बसवाले प्रवासी उचलत असल्याचा मुद्दा देखील मागील काही परिवहनच्या बैठकीत चांगलाच गाजला होता. दहा दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत प्रशासनाने अशा बसेसवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन परिवहन प्रशासनाने दिले होते. त्यानंतर या बसेसवर आळा बसेल अशी आशा वाटत होती. परंतु आता पुन्हा या बसेसने कोपरीत आपले पाय मारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे परिवहन प्रशासन, आरटीओ आणि पोलीस एखाद्या मोठ्या अपघाताची वाट बघते आहे का? असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाRto officeआरटीओ ऑफीस