शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण गृहनिर्माण मंडळाच्या अधिकाºयांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:21 IST

पैसे देऊनही भूखंडाचे ताबापत्र किंवा ताबा न देता ग्राहकाला सदोष सेवा पुरवणाºया कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक

ठाणे : पैसे देऊनही भूखंडाचे ताबापत्र किंवा ताबा न देता ग्राहकाला सदोष सेवा पुरवणाºया कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक आणि कल्याण सब डिव्हीजनच्या उपअभियंत्याला ३० हजारांचा दंड ग्राहक मंचाने सुनावला आहे. तसेच जाधव यांना लॉटरीत मिळालेल्या भूखंडाचा किंवा त्याच क्षेत्रफळाच्या जिल्ह्यात अन्यत्र असलेल्या भूखंडाचा ताबा देण्याचे आदेशही मंचाने दिले.दिवा येथील छाया जाधव यांनी टिटवाळा येथील वसाहतीमधील एका भूखंडासाठी अर्ज केला होता. लॉटरीमध्ये निवड झाल्यावर त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून भूखंडाचा भाडेपट्टा करार दुय्यम निबंधक कल्याण येथे नोंदणीकृत केला. मात्र, जाधव यांना ताबापत्र दिले नाही. त्यांनी याबाबत अनेकदा विचारणा केली. नोटीस पाठवली, तरीही कार्यवाही न केल्याने जाधव यांनी मंडळाच्या मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक आणि कल्याण सब डिव्हीजनचे उपअभियंता यांच्याविरोधात मंचात तक्रार दाखल केली. नोटीस मिळूनही त्यांनी आपली बाजू मांडली नाही.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता जाधव यांनी भूखंडासाठी केलेला अर्ज मिळाल्याची पोचपावती मंचात आहे. लॉटरीनंतर महाराष्टÑ गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत एक भूखंड जाधव यांना देण्याचे कळवल्याच्या पत्राची प्रत उपलब्ध आहे. जाधव यांनी कागदपत्रे आणि भूखंड खरेदीकरिता ३८ हजार ८३७ रुपये दिल्याच्या पावत्या आहेत. भूखंडाची रक्कम भरल्याचे प्रमाणपत्र आहे. मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक यांनी विनंती केल्यानुसार मुद्रांक अधीक्षक यांनी मुद्रांक शुल्क निश्चित केले. त्यानुसार, जाधव यांना भाडेपट्टा करार दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणीकृत करून दिल्याची कराराची प्रत मंचाकडे आहे. जाधव यांनी पाठवलेली स्मरणपत्रे व नोटीसची प्रतही मंचाकडे आहे. भूखंड वितरणाची संपूर्ण कार्यवाही करूनही जाधव यांना भूखंडाचा ताबा न देता सदोष सेवा दिली, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे जाधव यांना लॉटरीत लागलेल्या भूखंडाचा किंवा जिल्ह्यातील इतर ठिकाणी तेवढ्याच क्षेत्रफळाच्या भूखंडाचा ताबा १ आॅगस्टपर्यंत द्यावा. तसेच भरपाई व तक्रार खर्च मिळून ३० हजार रुपये द्यावे, असे आदेश मंचाने दिले आहेत.