शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

अपंग शिक्षिकेचा ज्ञानदानाचा वसा; व्यंगावर मात करत जिद्दीने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:40 IST

प्रतिभा हिलीम या प्राथमिक शिक्षिका म्हणून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पंचायत समितीअंतर्गत राहनाळ येथे कार्यरत असताना २०१९ साली तापामुळे आजारी पडल्या. हा आजार एवढा बळावला गेला की त्यांना आपले दोन्ही हातपाय अर्ध्यातून गमवावे लागले. मात्र एवढे मोठे संकट आले तरीही त्या खचल्या नाहीत.

- हुसेन मेमनजव्हार: असे एकही क्षेत्र नाही की ज्यात महिलांनी आपली छाप पाडली नाही. अशीच एक प्रेरणादायी कहाणी पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील कºहे येथील प्रतिभा हिलीम या अपंग शिक्षिकेची आहे. जिद्दी, हुशार, कष्टाळू व समर्पण भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या या शिक्षिकेची कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.प्रतिभा हिलीम या प्राथमिक शिक्षिका म्हणून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पंचायत समितीअंतर्गत राहनाळ येथे कार्यरत असताना २०१९ साली तापामुळे आजारी पडल्या. हा आजार एवढा बळावला गेला की त्यांना आपले दोन्ही हातपाय अर्ध्यातून गमवावे लागले. मात्र एवढे मोठे संकट आले तरीही त्या खचल्या नाहीत. त्यांचे मूळ गाव विक्र मगड तालुक्यातील कºहे असल्यामुळे आपण गावाच्या ॠणात आहोत याची जाणीव ठेवून त्या आपल्या गावी आल्या. त्यानंतर कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद झाल्या. शाळा सुरू करण्याजोगी परिस्थिती कधी निर्माण होईल, हेही सांगता येणे कठीण झाले. शाळा सुरू झाल्याच तरी सामाजिक अंतराचे नियम काय असतील आणि ते पाळून शाळा पूर्ववत चालवता येतील का, हेही सांगता येणे कठीण झाले. सरकारने शाळा ‘आॅनलाईन’ सुरू करायला परवानगी दिली. अनेक शाळांनी आॅनलाईन उपक्रम सुरू देखील केले. परंतु ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, पालकांकडे अ‍ॅण्ड्राइड मोबाइल नसणे यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.ही बाब त्यांच्या लक्षात आली. या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून येथील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांनी ज्ञानदानाच्या कार्याला सुरुवात केली. आपल्या अपंगावर यशस्वीपणे मात करत जे विद्यार्थी आज आॅनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य त्या करीत आहेत.इयत्ता पहिली ते सातवीपर्र्यंतच्या साधारणपणे २५ विद्यार्थ्यांना त्या शिकविण्याचे काम करतात. आपल्या हाताच्या बेल्टला पेनाचे टोपण लावून त्यात खडू वापरून त्या विद्यार्थ्यांना शिकवितात. त्यांचे हे ज्ञानदानाचे कार्य खरोखरच सर्वाना प्रेरणा देणारे आहे.कोरोना महामारीच्या काळात सरकारने शाळा ‘आॅनलाइन’ सुरू करायला परवानगी दिली. परंतु, ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, पालकांकडे अँड्राइड मोबाइल नसणे, यामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत. ही बाब माझ्या लक्षात आली आणि मग या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरू करण्यात आले.- प्रतिभा हिलीम, प्राथमिक शिक्षिका