शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘कलेक्टर अ‍ॅडमिन’द्वारे अर्जदारांना आता मिळणार आॅनलाइन माहिती !

By admin | Updated: August 5, 2015 00:14 IST

विविध कामांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अर्जावर झालेल्या कारवाईची माहिती त्यांना तत्काळ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांसह

ठाणे : विविध कामांसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अर्जावर झालेल्या कारवाईची माहिती त्यांना तत्काळ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांसह जिल्हाधिकारी कार्यालयातही ‘कलेक्टर अ‍ॅडमिन’ या पदाची निर्मिती करून एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्याची जबाबदारी दिली जाणार आहे. यासह जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या कार्यालयांमध्येही अ‍ॅडमिन सेवा १५ आॅगस्टपासून ठाण्यासह राज्यातील पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा जिल्ह्यांत एकाच दिवशी सुरू केली जाणार आहे.व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल, मेसेज आदी स्वरूपाच्या आॅनलाइनच्या जगात मागे न राहता राज्य शासनाने ‘आपले सरकार’ हा प्रकल्प राज्यभर लागू केला आहे. तत्पूर्वी राज्यातील सहा जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत आहे. यासाठी जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या कार्यालयांत आॅनलाइन सेवा देण्यासाठी ‘अ‍ॅडमिन’ या पदाची निर्मिती करून त्याद्वारे नागरिकांस त्यांच्या अर्जाची माहिती ‘आॅनलाइन’ घरी बसून घेता येणार आहे. यासाठी आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ‘कलेक्टर अ‍ॅडमिन’पद तयार करून एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर त्याची जबाबदारी दिली जाणार आहे. जि.प.साठी झेडपी अ‍ॅडमिन, ग्रामीण भागासाठी तैनात असलेल्या ‘पोलीस अधीक्षक’ कार्यालयासाठी एसपी अ‍ॅडमिन, ठाणे पोलीस आयुक्त व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी ‘सीपी अ‍ॅडमिन’ आॅनलाइन सेवा देणार आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भार्इंदर या महानगरपालिकांसाठी कार्यालयांमध्ये ‘म्युनिसिपल अ‍ॅडमिन’ कार्यरत होऊन मोबाइल मेसेज, ई-मेल आदींवर १५ आॅगस्टपासून माहिती मिळेल.