शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

वाचकांसाठी खुले केले ज्ञानभांडार; दुर्मीळ संदर्भग्रंथांचे भरवले प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:00 IST

कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : समग्र सेतू माधवराव पगडी संपूर्ण खंड, स्वामी विवेकानंद ग्रंथावली, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांसारख्या दुर्मीळ संदर्भग्रंथांचा खजिनाच कल्याण सार्वजनिक वाचनालयाने वाचकांसाठी खुला केला आहे. ठाणे, पालघरच्या वाचकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.जागतिक पुस्तक दिनानिमित्त मंगळवारी सार्वजनिक वाचनालयातर्फे दुर्मीळ ग्रंथ आणि संदर्भग्रंथांचे हे पहिलेच प्रदर्शन भरवण्यात आले आहे. वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या वाचनालयाला १५६ वर्षांची परंपरा आहे. अनेक विषयांवरील संदर्भग्रंथ वाचनालयात उपलब्ध आहेत. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग होतो. वाचनालयाच्या रामबाग येथील शाखेत विद्यार्थी बसून दुर्मीळ ग्रंथाच्या वाचनाचा आनंद घेतात. हे दुर्मीळ गं्रथ त्यांना घरी नेण्याची परवानगी नाही. ही सेवा अभ्यासकांना मोफत उपलब्ध करून दिली जाते. संदर्भग्रंथाविषयी अभ्यासकांना माहिती व्हावी. प्रदर्शनाच्या माध्यमातून ते वाचकांपर्यंत पोहोचतील. ज्यावेळी वाचकांना त्यांची गरज असेल, तेव्हा ते त्यांचा वापर करतील. तीन हजारांहून अधिक दुर्मीळ व संदर्भग्रंथ या प्रदर्शनात मांडले आहेत. या प्रदर्शनासाठी वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, ग्रंथालयातील कर्मचारी, ग्रंथपाल यांनी मेहनत घेतली.दुर्मीळ ग्रंथ पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे. ती संधी या प्रदर्शनामुळे मिळत असल्याचे वाचक अरुण विसपुते यांनी सांगितले. या प्रदर्शनाच्या दर्शनी भागात भारतीय संविधानाची प्रत ठेवली आहे. भारतीय संस्कृतीकोश, भक्तिकोश, ज्ञानकोश, मराठी विश्वचरित्रकोश, शब्दकोश, व्यायामकोश, वारकरी संप्रदायकोश, ज्ञानेश्वरी, बायबल, कुराण, डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण साहित्य, बहुतसमांतरकोश, भारतीय समाजविज्ञानकोश, रामायणसारखे ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.डिजिटायझेशन सुरू१८०० पासूनची पुस्तके या प्रदर्शनात आहेत. यातील काही पुस्तकांचे मूल्य ५० पैसे, तर काहींचे दोन ते तीन रुपये आहे. या पुस्तकांना वाळवी लागू नये, म्हणून औषधफवारणी केली जाते. या दुर्मीळ ग्रंथांचे जतन करण्यासाठी डिजिटलायझेशन सुरू आहे. थोड्याच दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती भिकू बारस्कर यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे