शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

ठाण्यातील संगीत कट्ट्यावर "किशोर कुमारांच्या" आठवणींना दिला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 16:12 IST

सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ठाण्यातील   संगीत कट्ट्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

ठळक मुद्देसंगीत कट्ट्यावर "किशोर कुमारांच्या" आठवणींना उजाळा "किशोरजींचा वाढदिवस"कट्ट्याच्या कलाकारांनी उत्साहात केला साजरा प्रत्येक संगीत कट्ट्यावर "व्हॉईस ऑफ संगीत कट्टा" निवडणार : किरण नाकती

ठाणे :  ठाण्यातील  संगीत कट्ट्यावर "सदाबहार किशोर" हा कार्यक्रम सादर झाला.यात किशोरजींनी गाऊन अजरामर केलेली गाणी सादर करत "किशोरजींचा वाढदिवस"कट्ट्याच्या कलाकारांनी उत्साहात साजरा केला.यंदाचा हा १६ क्रं चा कट्टा होता.

मेरा जीवन कोरा कागज,चेहरा हे या,हम दोनो दो प्रेमी,छुकर मेरे मन को,क्या यही प्यार है, ये राते ये मौसम,तेरे जैसा यार कहा,परदेसीया,चलते चलते हि गाणी कट्ट्याच्या कलाकारांनी सादर करताच प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.  ज्ञानेश्वर मराठे,किरण म्हापसेकर,सुप्रिया पाटील,विनोद पवार,रुपाली कांबळे,प्रणव कोळी,श्रेया वरे, राजू पांचाळ,सायली अंगणे, निनाद घाग,निशा पांचाळ ,राज-कुणाल,योगेश मंडलिक या संगीत कट्ट्याच्या कलाकरांनी यावेळी गाणे गात किशोरजींच्या आठवणींना उजाळा दिला.या वेळी विजय वागळे यांनी "ये राते ये मौसम"हे गाणे शिट्टी वाजवत सादर केले.कुणाल व राज या बालकलाकारांनी छुकर मेरे मनको या गाण्याचे अप्रतिम सादरीकरण केले.या गाण्याला "वन्स मोअर"देत प्रेक्षकांनी हे गाणे पुन्हा सादर करण्याची विनंती केली. यावेळी अभिनय कट्ट्याच्या संस्कार शास्त्राच्या कलाकारांनी "चिल चिल चिल्लाके" या गाण्यावर नृत्य सादर केले.परेश दळवी या कट्ट्याच्या कलाकाराने "मै हू झुम झुम झुमरु" या गाण्यावर नृत्य सादर करत प्रेक्षकांना किशोरजींच्या काळाची आठवण करून दिली. या कार्यक्रमासाठी विणा टिळक यांनी परीक्षण केले.या प्रसंगी निवेदकांनी किशोर कुमार यांचे गाणे रेकॉर्डींग च्या दरम्यान घडलेले विनोदी किस्से  सांगत कार्यक्रमात रंग भरला. दीपप्रज्वलन प्रभाकर केळकर आणि विजया केळकर यांनी केले.या कार्यक्रमात संपूर्ण  व्यासपीठावर किशोरजींच्या सुंदर प्रतिमा लावण्यात आल्या होत्या.हि नेत्रदीपक सजावट पाहून आम्ही किशोरजींच्या काळात जाऊन आल्याचा भास झाला असे एका ज्येष्ठ प्रेक्षकाने सांगितले.या कार्यक्रमाचे नेपथ्य सहदेव साळकर व ओमकार मराठे यांनी केले होते. किशोरजींच्या वाढदिवसाचे निमित्त साधत आयोजक किरण नाकती यांनी या संगीत कट्ट्यापासून प्रत्येक संगीत कट्ट्यावर "व्हॉईस ऑफ संगीत कट्टा"आपण निवडणार आहोत असे घोषीत केले. व्हॉईस ऑफ संगीत कट्टा म्हणून विनोद पवार,ज्ञानेश्वर मराठे,राजू पांचाळ,यांची निवड करण्यात आली तसेच लक्ष्यवेधी म्हणून राज व  कुणाल,निनाद व प्रणव या जोडीला सन्मानीत करण्यात आले.डॉ प्रभाकर केळकर व विजया केळकर यांनी गेस्ट पेरफॉमन्स मध्ये "गीत गाता हु मै" आणि "मेरी निंदो मे तुम" ही गाणी सादर केली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई