शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या कुशीतून अपहरण झालेला ' दादा ' सापडला; चार तासात गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश

By अजित मांडके | Updated: October 12, 2024 16:07 IST

ही कारवाई करत ठाणेनगर पोलिसांना हा गुन्हा ०४ तासात उघडकीस आणला आहे.

ठाणे : आईच्या कुशीत झोपी गेलेल्या ०५ महिन्याच्या " दादा "  नामक बाळाचे अपहरण करणाऱ्या एका त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांनी अटक करत, त्या बाळाची सुखरूप सुटका केली. ही कारवाई करत ठाणेनगर पोलिसांना हा गुन्हा ०४ तासात उघडकीस आणला आहे. अटक केलेल्या त्रिकुटामध्ये दोन महिलांचा समावेश असून यातील जावेद न्हावी याच्याविरोधात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणेनगर, राबोडी आणि कळवा या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या बाळाला त्याच्या आईच्या ताब्यात दिल्यावर त्या मातेचे डोळे पाणवले.

राबोडी परिसरातील जावेद अजमत अली न्हावी (३५), सुरेखा राजेश खंडागळे (३४) आणि क्रीक नाका येथील जयश्री याकूब नाईक (४५) असे अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाने नाव आहे. ठाण्यातील जेल तलाव जवळील उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या वनिता पवार (३५) या शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे ०५ महिन्याच्या दादा नामक बाळाला घेऊन झोपी गेल्या होत्या. याचदरम्यान बाळ कुशीत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट ठाणे नगर पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीच्याआधारे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला.  त्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत, ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक स्थापन करून त्या बाळाला शोधण्यास सुरुवात झाली.

याचदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बाळाला नेणाऱ्यांची माहिती पुढे आल्यावर पोलिसांनी त्यांना अटक करत बाळाची सुटका केली. तसेच हा गुन्हा अवघ्या ०४ तासात उघडकीस आणला. तसेच त्या त्रिकुटाने नेमके कशासाठी बाळाचे अपहरण केली. ते तो बाळ कोणाला विकणार होते का ? किंवा या पूर्वी त्यांच्या अशाप्रकारे गुन्हे दाखल आहेत का ? यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का? त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

ठाणेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक खेडकर, हेडकॉन्स्टेबल विक्रम शिंदे,  गांगुर्डे, पोलीस हवालदार तानाजी अंबूरे, सागर पाटील, प्रकाश जाधव, पंकज  दाभाडे, संदीप चव्हाण या पथकाने अवघ्या चार तासांमध्ये अपहरण झालेले ०५ महिन्याचे  बाळ व त्या त्रिकुटाचा शोध घेऊन हा गुन्हा उघड आणण्यात यश आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत मारकड करत आहेत.