शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीतील माणुसकी , पोरांनी नाकारलेल्या आईचा पोलीसच झाले आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:05 IST

मरणासन्न अवस्थेत असलेल्या वृध्द आईला पोटच्या तीन मुलांनी नाकारत निराधार अवस्थेत सोडून दिले, पण अखेर बाजारपेठ पोलिसांनी तिला आधार दिला आहे.

कल्याण : मरणासन्न अवस्थेत असलेल्या वृध्द आईला पोटच्या तीन मुलांनी नाकारत निराधार अवस्थेत सोडून दिले, पण अखेर बाजारपेठ पोलिसांनी तिला आधार दिला आहे. स्वखर्चाने त्यांनी वृध्द आईला ठाण्यातील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आणि पोलिसांतील-खाकी वर्दीतील माणुसकीच्या ओलाव्याची प्रचिती दिली.पश्चिमेतील लालचौकी परिसरात रस्त्याच्या कडेला एक वृध्द महिला पडून असल्याचा कॉल नियंत्रण कक्षाने सोमवारी संध्याकाळी घेतला आणि त्याची माहिती तत्काळ बाजारपेठ पोलीस ठाण्याला कळविली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पाय सुजलेल्या अवस्थेत एक वृध्द महिला तेथे पडून होती. बाजारपेठ पोलिसांनी रुग्णवाहिका करुन तिला महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले. तिच्याकडे विचारपूस केली असता, ६५ वर्षीय वृध्देने तिचे नाव रमाबाई दत्तात्रय खंडागळे असल्याचे सांगितले. तिचे नातेवाईक, कोणी वारस आहे का? याविषयी विचारणा केली असता तिने दोन मुले आणि एक मुलगी असल्याचे पोलिसांना सांगितले. दोन्ही मुले आणि मुलगी विवाहित आहेत.पोलिसांनी रिक्षा करुन तिच्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुले सापडली आणि त्यांनी रमाबाई ही आपली आई असल्याचे पोलिसांना सांगितले.पण तिला आमच्याकडे आणू नका, असे सांगायला मुले विसरली नाहीत. तिच्या सुनाही तिला घरी घेऊन येऊ नका, असे म्हणाल्याने पोलिसांची आशा मावळली. दोन्ही मुले चांगल्या ठिकाणी कामाला आहेत, तरीही त्यांनी आईला असे नाकारल्यानंतर पोलिसांना शेवटची आशेचा किरण दिसला. तो म्हणजे रमाबाईची मुलगी मीनाक्षी हिचा. पोलिसांनी तिचा शोध घेतला. रमाबाईची मुलगी तरी तिला आपले म्हणेल, या आशेवर पोलीस तिच्या घरी पोचले. ती नर्सचे काम करते. तिनेही आईला माझ्या घरी आणू नका, असे सांगताच पोलीस सुन्न झाले.अखेर बाजारपेठ पोलीसच या वृध्द महिलेचे वारस झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी पोलिसांच्या मदतीने रमाबाई यांना ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले.दुसºयाच्या घरची कामे करुन मी माझ्या मुलांना शिक्षण दिले. त्यांना मोठे केले. मुले आपल्या पायावर उभी राहिल्यावर म्हातारपणी- आजारपणात मला आधार देतील, अशी माझी अपेक्षा होती. पण त्याऐवजी त्यांनीच मला निराधार केले. माझी प्रॉपर्टीही मुलांनी घेतली, असे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रमाबाई यांनी पोलिसांना सांगितले. तेव्हा त्यांची कशी समजूत काढावी हे पोलिसांना समजेना.