शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार! २० हजारांपेक्षा अधिक रोकड बाळगल्यास आचारसंहितेचा भंग ठरणार? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 19:35 IST

२० हजारांपेक्षा अधिक बेहिशेबी रोकड बाळगल्यास त्या व्यक्तीवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा

भाईंदर, दि. ३० - मीरा-भार्इंदर महापालिका निवडणूक काळात कोणत्याही व्यक्तीने २० हजारांपेक्षा अधिक बेहिशेबी रोकड बाळगल्यास त्या व्यक्तीवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असे फर्मानच प्रशासनाने भरारी पथकाला दिल्याने अजब निवडणूक प्रशासनाच्या या गजब फंड्यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे.यंदाची निवडणुक कॅशलेस व्यवहाराशी संबंधित आहे की काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. याच अनुषंगाने प्रशासनाने शनिवारी प्रभाग समिती सहा अंतर्गत नियुक्त केलेल्या स्टॅटिक सर्व्हलेंस टीमने (भरारी पथक) काशिमीरा येथील नीलकमल नाक्यावर एमएच-०४-एचडी-३८४८ या टेम्पोची झाडाझडती घेतली. त्यावेळी टेम्पो चालकाजवळ ११ लाख ४६ हजार ४१७ रुपयांची रोकड सापडली. ही रोकड सिगारेटच्या विक्रीतून मिळाल्याचा दावा चालकाकडून करण्यात आला. तरी देखील पथकाने चालकासह टेम्पोला काशिमीरा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची चौकशी अद्यापही सुरू असल्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विलास सानप यांच्याकडून सांगण्यात आले आहे. परंतु, यंदाच्या पालिका निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही व्यक्तीने २० हजारापेक्षा अधिक रोकड सोबत बाळगल्यास त्या व्यक्तीवर आचारसंहितेच भंग ठरत असल्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसे फर्मानच निवडणूक प्रशासनाकडून बजावण्यात आल्याने यंदाच्या निवडणुकीतील प्रशासन कॅशलेस व्यवहाराचा अप्रत्यक्षपणे प्रचार करीत आहे की काय, असा प्रश्न मतदारांना पडू लागला आहे. त्यातच अत्यावश्यक खर्चासाठी २० हजारांपेक्षा अधिक रक्कम बाळगायची झाल्यास निवडणूक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार का, असा संतप्त प्रश्नही उपस्थित केला जात आहे.  

वरिष्ठ शिक्षक संपत मोरे : यंदाच्या पालिका निवडणुकीचे औचित्य साधून निवडणूक प्रशासन डिजिटल सरकारच्या कॅशलेस व्यवहाराचा प्रचार करीत असल्याचा प्रत्यय येत आहे. निवडणुक प्रशासनाने अशा प्रकारचा मोघलाई आदेश नागरीकांवर लादू नये. अन्यथा मतदानावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रभाग समिती ६ मधील भरारी पथकाचे अधिकारी अविनाश जाधव : निवडणूक निर्णय अधिकारी अशोक मुंडे यांच्या आदेशानुसार २० हजारांपेक्षा अधिक रोकड आढळुन आल्यास आचारसंहितेचा भंग ठरत असल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसारच कारवाई केली जात आहे.