शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी आयुक्तांवरील कारवाईचे गंडांतर टळणार

By admin | Updated: June 3, 2016 01:55 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३१ मे अखेरपर्यंत ७५० घरांत शौचालये बांधण्यात आली असून साडेचारशे शौचालयांचे काम प्रगतीपथावर

कल्याण : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३१ मे अखेरपर्यंत ७५० घरांत शौचालये बांधण्यात आली असून साडेचारशे शौचालयांचे काम प्रगतीपथावर असल्याचा दावा मलनि:सारण विभागाने केला आहे. त्यामुळे या प्रकरणी नगरविकास खात्याकडून आयुक्तांवर असलेली कारवाईची टांगती तलवार दूर होण्याची चिन्हे आहेत.अनुदान घेतल्यानंतरही शौचालयाचे काम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांकडून ती रक्कम माघारी घेतली जाणार आहे. ती न दिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक घरात शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. यासाठी केंद्र सरकारकडून चार, राज्य सरकारकडून ८ तसेच महापालिकेतर्फे १६ असे २८ हजारांचे अनुदान शौचालय बांधण्यासाठी दिले जात आहे. केडीएमसीच्या सर्वेक्षणात तीन हजार १६४ घरांत शौचालय नसल्याचे आढळून आले. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार केलेल्या छाननीत एक हजार ८३१ लाभार्थी निश्चित करण्यात आले. शौचालये बांधण्याचे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आयुक्त ई. रवींद्रन यांनी ठेवले होते. त्यातील ७५० शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. साडेचारशे शौचालयांचे काम सुरू असून ती अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात आहे.