शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रीपदासाठी केळकरांना हवा संघाचा आशीर्वाद

By admin | Updated: April 25, 2016 03:03 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात आपली वर्णी लागावी, याकरिता संजय केळकर यांनी व्यूहरचना सुरू केली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वजन आपल्याच पारड्यात पडावे,

ठाणे : राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात आपली वर्णी लागावी, याकरिता संजय केळकर यांनी व्यूहरचना सुरू केली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वजन आपल्याच पारड्यात पडावे, याकरिता ते प्रयत्नशील असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. शिवसेनेचे आक्रमक नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपाचा मवाळ व अभ्यासपूर्ण चेहरा म्हणून आपल्याला संधी मिळावी, असा प्रयत्न केळकर यांनी सुरू केल्याचे कळते.रवींद्र चव्हाण हे कामाचा उरक व आक्रमकतेकरिता परिचित आहेत. मात्र, संघ परिवाराला ते फारसे आवडत नाहीत. किसन कथोरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात आल्याने त्यांच्यापेक्षा पक्षाचे स्वयंसेवक राहिलेल्या केळकर यांचाच मंत्रीपदाकरिता विचार व्हावा, असे काही नेत्यांना वाटते. केळकर यांना मंत्रीपद दिले तरी ते ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देऊ शकतील किंवा कसे, याबाबत भाजपात भिन्न मतप्रवाह आहेत. शिंदे हे आक्रमक असल्याने त्यांच्याशी दोन हात करण्याकरिता तसाच आक्रमक नेता असावा व त्याला मंत्री करून ताकद द्यावी, असा एक मतप्रवाह आहे, तर शिंदे आक्रमक असल्याने भाजपाने नेमस्त व्यक्तीकडे नेतृत्व दिल्यास सुशिक्षित, शांतताप्रिय मतदार भाजपाकडे आकर्षित होतील, असा दुसरा मतप्रवाह आहे. केळकर हे दोनवेळा कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे सुशिक्षित पदवीधर मतदारांत ते परिचित आहेत. तसेच ठाणे शहराध्यक्षपदाची धुराही काही महिने त्यांनी सांभाळली आहे. परंतु, ठाण्यातून ते प्रथमच आमदार म्हणून निवडून आले आहेत. शहराध्यक्षपदाची जबाबदारी जेव्हा त्यांच्या खांद्यावर होती, त्यावेळी विखुरलेल्या भाजपाला एकसंध करण्यात अपयश येत असल्याचे पाहून त्यांनी श्रेष्ठींना पत्र पाठवून पदमुक्त करण्याची विनंती केली होती. सध्यादेखील ठाण्यात भाजपा विखुरलेलीच आहे. काही नगरसेवकांमध्ये विस्तव जात नाही. त्यामुळे केळकर यावेळी तरी भाजपाला एकत्र आणतील की मंत्रीपद देऊनही पलायनवादी भूमिका घेतील, असा सवाल पक्षातील काही मंडळी करीत आहेत. तसे झाल्यास त्या मंत्रीपदाचा केवळ केळकर यांना लाभ होईल, असे बोलले जात आहे. दरम्यान, आगामी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून केली जाऊ शकते. (प्रतिनिधी)