शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

केडीएमटीचे आता ‘मनसे’ खाजगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:38 IST

एकीकडे केडीएमटी उपक्रमाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला असताना दुसरीकडे विरोधीपक्ष असलेल्या मनसेनेदेखील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी खाजगीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु, परिवहनमधील कर्मचाºयांना महापालिका सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून पार पाडली जात नाही, तोवर खाजगीकरण होऊ देणार नाही

कल्याण - एकीकडे केडीएमटी उपक्रमाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला असताना दुसरीकडे विरोधीपक्ष असलेल्या मनसेनेदेखील प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी खाजगीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु, परिवहनमधील कर्मचाºयांना महापालिका सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून पार पाडली जात नाही, तोवर खाजगीकरण होऊ देणार नाही, असा पवित्रा येथील कर्मचाºयांच्या संघटनांनी घेतला आहे. लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन अंतिम भूमिका मांडली जाईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.गेल्या सोमवारी केडीएमसीचा अर्थसंकल्प महासभेला सादर करण्यात आला. स्थायी सभापती राहुल दामले यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात परिवहनच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. केडीएमटीची स्थापना होऊन अनेक वर्षे उलटली. पण, अद्यापही हा उपक्रम सक्षम होऊ शकलेला नाही. उपक्रमाला ऊर्जितावस्था यावी म्हणून अनेकदा प्रयत्न झाले. परंतु, उपक्रमाच्या कारभारात काहीही सुधारणा झाली नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. केडीएमटी कर्मचारी महापालिका सेवेत सामावून घेऊन या उपक्रमाचे खाजगीकरण करण्याची वेळ येऊन ठेपल्याचा मुद्दा अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. तत्पूर्वी काही महिन्यांपूर्वी महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही किमान १०० बसेस रस्त्यावर धावल्या नाहीत, तर खाजगीकरणाचा विचार करावा लागेल, असा इशारा केडीएमटी प्रशासन आणि कर्मचारी यांना दिला होता. सत्ताधाºयांचा कल खाजगीकरणाकडे असताना विरोधीपक्ष मनसेनेही याला पाठिंबा दिला आहे. मनसेचे परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी याप्रकरणी महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त गोविंद बोडके, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, मनसेचे गटनेते प्रकाश भोईर आणि स्थायी समिती सभापती राहुल दामले यांच्याकडे पत्रव्यवहार करून केडीएमटी खाजगीकरणाबाबत गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली आहे. प्रारंभीच्या काळात परिवहनसेवा फायद्यात होती. मात्र, २६ जुलै २००५ ला अतिवृष्टी होऊन महापूर आला. यात केडीएमटीच्या ७०-८० बसेस पाण्याखाली गेल्याने नादुरुस्त झाल्या. परिणामी, उपक्रमाचे मोठे नुकसान झाले. तेव्हापासून जी घरघर लागली, ती आजतागायत कायम आहे. केडीएमसीने केडीएमटीला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु केडीएमसीचीच आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने केडीएमटी तोट्यातून बाहेर निघण्याची चिन्हे नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेता सर्वंकष अभ्यास करून खाजगीकरणाचा विचार करावा, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. तर, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीएमटीचे माजी सभापती राजेश कदम यांनीही सद्य:स्थिती पाहता परिवहनचे खाजगीकरण होणे आवश्यकच असल्याचे मत मांडले....तरच खाजगीकरणाला सहकार्य राहीलखाजगीकरणाच्या मुद्यावर कर्मचाºयांना महापालिकासेवेत सामावून घेण्याची जोपर्यंत हमी मिळत नाही, तोपर्यंत आमचा खाजगीकरणाला विरोध राहील, असे मत महापालिका कामगार कर्मचारी संघटनेचे कृष्णा टकले यांनी ‘लोकमत’कडे मांडले. आमचा प्रशासनावर आणि कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास नाही. दोन दिवसांत संघटनेची अंतर्गत बैठक लावण्यात आली असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही टकले म्हणाले. खाजगीकरणाचा निर्णय अन्य कोणत्याही महापालिकेत झालेला नाही. राज्यसरकाने २०१६ साली काढलेल्या अध्यादेशानुसार जर सेवा तोट्यात चालली असेल, तर त्या सेवेला महापालिकेने सहकार्य करावे, असा नियम आहे.मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या मागील अर्थसंकल्पात २७ कोटींची तरतूद केली असताना केवळ १५ कोटीच देण्यात आले. पण, उर्वरित तरतूद रद्द केल्याने कर्मचाºयांचे वेतन देणे अशक्य झाले. खाजगीकरणाचा विचार करायचा असेल, तर आधी कर्मचाºयांना महापालिका सेवेत सामावून घ्या. यासंदर्भात जोपर्यंत ठराव होत नाही आणि कृती होत नाही, तोवर खाजगीकरण होऊ देणार नाही, असा पवित्रा परिवहन कर्मचारी कामगार या मान्यताप्राप्त संघटनेचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी घेतला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका