शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटी कर्मचारी : ‘ते’ आदेश कागदावरच, डिसेंबरचा पगार जानेवारीअखेरपर्यंत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:15 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या केडीएमटी परिवहन उपक्रमातील कर्मचा-यांची वेतनाअभावी परवड सुरूच असून जानेवारी महिना संपायला आला, तरी डिसेंबरचे वेतन अद्याप या कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या केडीएमटी परिवहन उपक्रमातील कर्मचा-यांची वेतनाअभावी परवड सुरूच असून जानेवारी महिना संपायला आला, तरी डिसेंबरचे वेतन अद्याप या कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. सहाव्या वेतन आयोगाचे दिले जाणारे थकीत हप्ते गेले दोन महिने मिळालेले नाहीत. सभापती संजय पावशे यांनी पदभार स्वीकारताच महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच प्रशासनाने वेतन अदा करावे, असे आदेश दिले होते. परंतु, या डेडलाइनची अंमलबजावणी कागदावरच राहिली आहे.केडीएमटी उपक्रमात सुमारे ६०० कर्मचारी आहेत. वेतन दरमहिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित असताना ते महिन्याच्या अखेरीस होण्याची परंपरा कायम आहे. वेतनविलंबाचा मुद्दा वारंवार परिवहनच्या बैठकांमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.केडीएमटीला वेतनासाठी केडीएमसीकडून अनुदान मिळते. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यास केडीएमटीने सुरुवात केली होती. आॅगस्टपासून सुरू केलेली ही थकबाकी दोन महिनेच कर्मचाºयांना मिळाली. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थकबाकी मिळालीच नाही. या परिस्थितीमुळे कर्मचाºयांमध्ये रोषाचे वातावरण आहे.केडीएमटी प्रशासनाशी यासंदर्भात संपर्क साधला असता वेतन आयोगाची थकबाकी दिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, प्रशासन खोटे बोलत आहे, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. गुरुवारी तरी वेतन मिळाले पाहिजे. अन्यथा, तीन दिवस सुटी असल्याने अधिकच पंचाईत होणार असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.वेतनाला उशीर झाला, ही वस्तुस्थिती आहे. वेतन अनुदानाच्या धनादेशावर आयुक्तांची स्वाक्षरी झाली असून गुरुवारी वेतन कर्मचाºयांच्या खात्यात जमा होईल. सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते देण्यात आले आहेत.- देविदास टेकाळे, महाव्यवस्थापक, केडीएमटी

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका