शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटी अधिकच खोलात! , बहुतांश यंत्रणा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:48 IST

भार्इंदर कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाची दिवसागणिक बिकट अवस्था होत असून देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटाचे तीनतेरा वाजले असताना कोट्यवधी रुपयांच्या थकीत बिलांपोटी अन्य सुविधाही बंद पडल्या आहेत.

कल्याण : भार्इंदर कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाची दिवसागणिक बिकट अवस्था होत असून देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटाचे तीनतेरा वाजले असताना कोट्यवधी रुपयांच्या थकीत बिलांपोटी अन्य सुविधाही बंद पडल्या आहेत. त्यातच कार्यशाळाप्रमुख अनंत कदम यांनी दिलेला राजीनामा चर्चेचा विषय ठरला असून दोन दिवसांपूर्वी परिवहनच्या सदस्यांनी अचानकपणे केलेल्या दौ-यात केडीएमटी उपक्रमाचा बेजबाबदार कारभारही चव्हाट्यावर आला आहे.केडीएमटी उपक्रम सद्य:स्थितीला डबघाईला आला आहे. एकेकाळी सहा ते साडेसात लाखांपर्यंतचे दैनंदिन उत्पन्न आजच्या घडीला साडेतीन लाखांच्या आसपास आले आहे. देखभाल दुरुस्तीअभावी बस नादुरुस्तीचे प्रमाण वाढत असताना आता दुरुस्तीच्या कंत्राटाचे कोट्यवधींचे बिल थकल्याने तसेच कंत्राटाची मुदतही संपुष्टात आल्याने संबंधित कंत्राटदाराने काम करण्यास नकार दिला आहे.आजमितीला जुन्या १०० बसपैकी ७२ बस बंद आहेत. उरलेल्या २८ बसची छोटीमोठी दुरुस्तीची कामे करणे असतानाही या मार्गावर धावत आहेत. कालांतराने त्याही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत उपक्रमामध्ये दाखल झालेल्या नवीन ११८ बसपैकी ७० बस २ वर्षांपासून आहेत. यातील ४२ बस टायर व इतर सुटे भाग नसल्यामुळे बंद आहेत. सद्य:स्थितीला ७० पैकी केवळ २७ बस धावत आहेत. नुकत्याच दाखल झालेल्या नवीन ४० मिडीबसपैकी ३५ मिडीबसच मार्गावर जाऊ शकतील, अशी अवस्था आहे.उर्वरित ५ मिडीबस टायर नसल्याने उभ्या आहेत. कंत्राटदाराने काम करणे थांबवल्याने देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेच्या १४ ते १५ कामगारांच्या जोरावर चालवणे अशक्य असून अशा परिस्थितीत उपक्रम लोकाभिमुख सेवा कशी देणार, असा सवाल सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे.यासंदर्भात सदस्य संतोष चव्हाण यांनी महाव्यवस्थापकांसह महापौर, परिवहन सभापती यांना पत्रव्यवहार करून वास्तवतेकडे लक्ष वेधले आहे. कंत्राटाचा कालावधी संपण्याअगोदर २ महिने नवीन कंत्राटदार नेमण्याची कार्यवाही का करण्यात आलेली नाही. संबंधित कंत्राटदाराशी चर्चा झाली होती का, तो काम करण्यास इच्छुक नसेल तर करारनाम्यातील अटीशर्तीनुसार त्याला नोटीस बजावली होती का, असे विविध सवाल चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत.यामुळे केडीएमटी पुन्हा एकदा वादाच्या भोवºयात सापडले आहे.व्यवस्थापक टेकाळे यांच्यावर आणणार अविश्वासाचा ठरावशुक्रवारी परिवहन सदस्य असलेल्या संतोष चव्हाण, संजय राणे आणि राजेंद्र दीक्षित यांनी अचानक गणेशघाट आगाराला दिलेल्या भेटीत प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आणला. कॅशचा भरणा करण्यासाठी नेलेल्याची नोंद हजेरीवहीवर नसणे, सुरक्षारक्षकांकरवी योग्य प्रकारे झडती न घेणे, बंदावस्थेतील संगणक असे काहीसे चित्र सदस्यांना पाहायला मिळाले.विशेष बाब म्हणजे वाहकांची जी तपासणी होते, ती देखील होत नसल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. हा सर्व प्रकार पाहताच सदस्यांनी सभापती संजय पावशे यांनाही घटनास्थळी बोलावले. या बेजबाबदार कारभाराबाबत नाराजी व्यक्त करताना व्यवस्थापक देविदास टेकाळे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याची माहिती चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.तो राजीनामा घरगुती कारणास्तवकंत्राटाअभावी बसच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न गंभीर बनला असताना कार्यशाळाप्रमुख अनंत कदम यांनी दिलेल्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी कदम यांनी राजीनामा दिला असून त्यात त्यांनी घरगुती कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितल्याची माहिती देविदास टेकाळे यांनी दिली. कोणतीही चर्चा न करता रजेवर गेले आणि राजीनामा मेल केल्याचे टेकाळे म्हणाले.