शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीत ‘कामबंद’

By admin | Updated: March 17, 2017 06:03 IST

भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक यांनी आपल्याला बुधवारी शहर अभियंत्याच्या दालनात मारहाण केल्याचा आरोप केडीएमसीचे कनिष्ठ अभियंता महेश गुप्ते यांनी केला आहे.

कल्याण : भाजपा नगरसेवक शैलेश धात्रक यांनी आपल्याला बुधवारी शहर अभियंत्याच्या दालनात मारहाण केल्याचा आरोप केडीएमसीचे कनिष्ठ अभियंता महेश गुप्ते यांनी केला आहे. याप्रकरणी गुप्ते यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बाजारपेठ पोलिसांनी धात्रक यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी महापालिका कामगारांनी दोन तास कामबंद आंदोलन केले.शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्या दालनात बुधवारी गुप्ते चर्चा करत असताना तेथे धात्रक आले. धात्रक यांनी गुप्ते यांना त्यांच्या प्रभागातील उद्यानाच्या कामाची फाइल का मंजूर करत नाही, ती कधी मंजूर करणार, अशी विचारणा करत धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिली.यासंदर्भात धात्रक यांनी सांगितले की, न झालेल्या कामाचा जाब मी गुप्ते यांना विचारला. तेथे आमची बाचाबाची झाली. त्यात कुलकर्णी यांनी मध्यस्थी केल्यावर आम्ही दालनाबाहेर पडलो. मात्र, दालनाबाहेर मी मारहाण केली, असा आरोप गुप्ते यांनी केला. तसेच माझ्याविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार एखाद्या दबंग नगरसेवकांकडून झाला असता, तर गुप्ते तक्रार देण्यासाठी गेले असते का? मी मारहाण केल्याचा गुप्ते यांचा आरोप आहे. महापालिकेचे सीसीटीव्ही फुटेज पाहावे. त्यात मी दोषी आढळल्यास माझ्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असे ते म्हणाले. भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून गुप्ते यांनी माझ्याविरोधात तक्रार दिली आहे, असा आरोपही धात्रक यांनी केला आहे. कुलकर्णी यांनी सांगितले की, माझ्या दालनात धात्रक व गुप्ते यांच्यात शाब्दिक चकमक झाली, ही वस्तुस्थिती आहे. त्यात, मी मध्यस्थी करत त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, धात्रक यांचा समर्थक गुप्ते यांच्या अंगावर धावून आला. पण, त्याने मारहाण केली नाही. गुप्ते यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत धात्रक यांचा व्यवसाय काय, हे माहीत नसल्याचे नमूद केले आहे. धात्रक हे नगरसेवक आहेत. हे गुप्ते यांना माहीत नाही का, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. तर, धात्रक यांनी सीसीटीव्ही पाहून काय ते तपासावे, असे आव्हान दिले असले, तरी कुलकर्णी यांच्या दालनात सीसीटीव्ही नाही. (प्रतिनिधी)