शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटी घडवणार कल्याण-डोंबिवली दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:42 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील गडकिल्ले, तलाव, जुनी मंदिरे, स्मारके तसेच विविध प्रकल्प अशा पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी आता ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील गडकिल्ले, तलाव, जुनी मंदिरे, स्मारके तसेच विविध प्रकल्प अशा पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी आता केडीएमटी उपक्रमाने कंबर कसली आहे. नागरिकांना या स्थळांना भेट देणे शक्य व्हावे, यासाठी केडीएमटी उपक्रमाकडून पर्यटकांसाठी एक विशेष बस सोडण्यात येणार आहे. या बसचे भाडे नाममात्र राहणार असून, बसच्या निर्मितीच्या कामाचा शुभारंभ परिवहन सभापती मनोज चौधरी आणि सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आला. आगळा वेगळा लूक असलेल्या या बसच्या निर्मितीचे काम ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस’च्या विद्यार्थ्यांकडून केले जाणार आहे.

दर रविवारी ‘मुंबईदर्शन’साठी जशी बस चालविली जाते, त्याप्रमाणे कल्याण-डोंबिवली दर्शन बससेवा सुरू करण्याची मागणी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी हिरवा कंदील दाखविल्यावर त्या बसच्या निर्मितीच्या कामाचा शुभारंभ उपक्रमाच्या गणेश घाट आगारात करण्यात आला. यावेळी सभापती चौधरी, सदस्य बंडू पाटील, अनिल पिंगळे, आगार व्यवस्थापक संदीप भोसले आणि अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कल्याण रेल्वे स्थानक बाहेरून ही बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या दहा दिवसांत ही बस उपलब्ध होईल, अशी माहिती चौधरी यांनी दिली. टिटवाळा महागणपती मंदिर, डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान, ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला यांसह अन्य शहरातील महत्त्वाच्या अन्य स्थळांची चित्रे या बसवर साकारली जाणार असल्याने बसला वेगळाच लूक लाभणार असल्याचेही ते म्हणाले.

असा असेल बसचा मार्ग

टिटवाळा महागणपती मंदिर ते कल्याण शीळ मार्गावरील दत्त मंदिर अशी ही बस चालविली जाणार असून या दरम्यानच्या दुर्गाडी किल्ला, दुर्गाडी गणेश घाट, बारावे जलशुद्धीकरण केंद्र, काळा तलाव, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, आर्ट गॅलेरी, सुभेदारवाडा, डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर, शहीद कॅप्टन सच्चन स्मारक, शहरालगत असलेले खिडकाळी मंदिर, शीळ फाटा येथील दत्त मंदिर आदी पर्यटन आणि नयनरम्य स्थळांचा यात समावेश आहे.

------------