शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या मदतीला केडीएमटी

By admin | Updated: July 6, 2017 06:02 IST

नोकरी-व्यवसायावरून सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे रिक्षांअभावी सध्या पावसाळ््यात होणारे हाल टाळण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : नोकरी-व्यवसायावरून सायंकाळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे रिक्षांअभावी सध्या पावसाळ््यात होणारे हाल टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेने कंबर कसली आहे. रिक्षाचालकांची अरेरावी मोडीत काढत केडीएमटीने सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान केळकर रोड (रिक्षा स्टॅण्ड) ते मानपाडा रोडच्या जंक्शनपर्यंत (कल्याण-शीळ रोड) तीन बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कायमस्वरूपी ही बससेवा देण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.डोंबिवली पूर्वेला स्थानकाबाहेरून शहरातील विविध भागांत जाण्यासाठी रात्री ८ नंतर रिक्षा मिळत नाहीत. पावसाळ््यात रस्त्यांवर कमी असलेल्या रिक्षा, खड्डे तसेच वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे रिक्षा स्टॅण्डवर पुरेसा रिक्षाच नसतात. मुजोर रिक्षाचालक अनेकदा भाडेही नाकारतात. त्यामुळे प्रवाशांचे नेहमीच त्यांच्याशी वाद होतात. या सगळ््या प्रकाराच्या निषेधार्थ प्रवाशांनी मागील आठवड्यात रिक्षा रोखून धरत संताप व्यक्त केला होता. प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता रिक्षेला वाहतुकीचा सक्षम पर्याय काय, असा प्रश्न वाहतूक विभागाला पडला आहे. केडीएमटीच्या अधिकाधिक बस रस्त्यावर आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. केडीएमटीने सायंकाळी ७ ते रात्री १० दरम्यान केळकर रोड ते मानपाडा रोडअखेरपर्यंत बस सोडण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिली. प्रायोगिक स्तरावर रविवार सायंकाळपासून या बस सोडण्याचा निर्णय झाला आहे. मंगळवारपासून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रवाशांनी कायमस्वरूपी या मार्गावर बस सोडण्याची मागणी केल्याचे ते म्हणाले. रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी शहरात ठिकठिकाणी केडीएमटीची सेवा देणे हाच एक पर्याय आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. परिवहन सभापती संजय पावशे यांनी गंभीरे यांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी केला असला तरी त्याची केडीएमटीत अद्याप त्याची रितसर नोंद नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मार्गावर कायमस्वरूपी बस चालवण्यासाठी केडीएमटी व्यवस्थापनाकडे नोंद असणे आवश्यक आहे. डोंबिवलीत रिक्षांअभावी प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वाहतूक नियंत्रण विभागाचे गोविंद गंभीरे यांनी लक्षात आणून दिले. त्यानसार वस्तूस्थितीचा आढावा घेत दोन-तीन बसच्या सहा फेऱ्या सायंकाळी तीन तासांत होत आहेत. त्यातून सहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. ही सुविधा कायम देण्याचा विचार आहे.- संजय पावशे, सभापती, परिवहन समिती