शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीच्या बसला पुन्हा आग

By admin | Updated: August 10, 2016 02:50 IST

केडीएमटीच्या बसला आगी लागण्याचे सत्र सुरुच आहे. गणेशघाट आगारातून बाहेर पडलेल्या बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एका

कल्याण : केडीएमटीच्या बसला आगी लागण्याचे सत्र सुरुच आहे. गणेशघाट आगारातून बाहेर पडलेल्या बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एका बसला आग लागली. हा प्रकार रेल्वे स्थानकासमोरील एसटी महामंडळाच्या कल्याण बस आगारात घडला. आयशर कंपनीच्या बसला पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनांना कार्यशाळा व्यवस्थापक अनंत कदम जबाबदार आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी परिवहन सदस्यांच्या वतीने परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे आणि आयुक्त ई रवींद्रन यांच्याकडे केली आहे. इंजिनमधील वायरमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मोहने-कल्याण मार्गावर जाणारी आयशर कंपनीच्या मिडी बसला आग लागल्याची घटना मुरबाड रस्त्यावर २९ जुलैला घडली होती. त्यावेळी बसमध्ये १२ प्रवासी होते. परंतु चालक आणि वाहकांनी वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने आगीचे प्रमाण फारसे वाढले नाही. त्याचबरोबर कोणालाही दुखापत झाली नाही. बसमधील अग्नीरोधक यंत्राने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. याआधी २१ जुलैला उपक्रमाच्या गणेशघाट आगारात उभी असलेली बस सुरु करताना बसने पेट घेतला होता. ही बसही आयशर कंपनीचीच होती. सोमवारी ज्या बसला आग लागली ती देखील आयशर कंपनीचीच होती. ही घटना रात्री दहाच्या सुमारास कल्याण बस आगारात केडीएमटीच्या थांब्यावर कल्याण-उंबर्डे या बसमध्ये घडली. यावेळी चालक मोहन खुरंगळे आणि वाहक शांताराम घोडे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. वारंवार घडलेल्या आगीच्या घटना पाहता आयशर कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)