शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रोटरीच्या सूतिकागृहमधील ‘मदर अ‍ॅण्ड चाईल्ड सेंटर’वर केडीएमसीचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 16:51 IST

वैद्यकीय मदत निधी ट्रस्ट आयोजित कै. परशुराम महाजन धनी माधवाश्रम व कै. प्रमोदिनी गजानन निमकर स्मृती आरोग्य सेवाव्रती पुरस्काराचे वितरण शुभमंगल कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आले होते.

डोंबिवली- सूतिकागृहामध्ये ‘मदर अॅण्ड चाईल्ड सेंटर’ उभे करण्यासाठी रोटरी क्लबने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे प्रस्ताव मांडला आहे. त्यासाठी एकूण 25 कोटीची तरतूद रोटरी क्लबने केली आहे. मात्र महापालिका त्याकडे डुकुनही पाहत नाही, अशी खंत बालरोगतज्ञ आणि रोटरी क्लबचे माजी डिस्ट्रीक्ट गव्र्हनर डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी व्यक्त केली.

वैद्यकीय मदत निधी ट्रस्ट आयोजित कै. परशुराम महाजन धनी माधवाश्रम व कै. प्रमोदिनी गजानन निमकर स्मृती आरोग्य सेवाव्रती पुरस्काराचे वितरण शुभमंगल कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. कोल्हटकर बोलत होते. हा पुरस्कार डॉ. विजय नेगलूर व डॉ. उल्हास कोल्हटकर यांना प्रदान करण्यात आला. मुंबई महानगरपालिका आरोग्यसेवा माजी संचालक डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. निशिकांत पतंगे, डॉ. सुनील गडकरी, डॉ. यशवंत घोटीकर ,डॉ. विश्वास पुराणिक, डॉ. इंद्रनील भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कोल्हटकर म्हणाले, आम्हाला पक्षीय राजकारणांशी काय घेणोदेणो नाही. अजून ही केडीएमसीने या प्रकल्पाला परवानगी दिल्यास आम्ही त्यांची अंमलबजावणी करू. डोंबिवली ही सुशिक्षितांची नगरी आहे मात्र याठिकाणी अद्याप मेडीकल कॉलेज नाही. भारतात आरोग्याची परिस्थिती गंभीर आहे. अमेरिकेत 2क् हजार रूपये प्रतिमाणूस आरोग्यावर खर्च केला जातो तर भारतात हाच दर 9क्क् रूपये प्रतिमाणूस आहे. त्यामुळेच आपल्याला आरोग्यनिधी उभारवा लागतो. त्याची कारणो काहीही असली तरी सरकार हे करीत नाही. संस्थांना त्यासाठी पुढे यावे लागते. 1992 मध्ये डोंबिवलीतील सर्व डॉकटरांनी एकत्र येऊन डोंबिवली फिव्हरचा नायनाट केला. डॉक्टरांनी नकारत्मक गोष्टी न ऐकू नये असे ही त्यांनी सांगितले.

अविनाश सुपे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रत तंत्रज्ञानाची कितीही प्रगती झाली असली तरी सेवाधर्म विसरू नका. सेवाधर्म रूग्णसेवेचा कणा आहे. आपल्याकडील अर्थसंकल्प मोठे असतात. पण त्यातील किती रक्कम प्रत्यक्ष आरोग्य सेवेवर खर्च होते हा प्रश्न आहे. यामधून गरीब रूग्णाची सर्वाधिक परवड होते अशा वेळी वैद्यकीय मदत निधीसारख्या संस्था खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईतील रूग्णालयात काम करताना आम्ही सामाजिक दायीत्वाच्या नात्याने 5क् ते 1क्क् कोटीचा निधी उभा केला आहे. काही दिवसांपूर्वी एका ग्रामीण  भागातील मुलगी उपचारासाठी मुंबईत आली होती. तिच्या आईवडीलांकडील उपचारांसाठीच पैसे संपले त्यावेळी त्यांनी व्हेटीलेटर काढून टाकण्यास सांगितले आणि निघून गेले. पण एका डॉक्टरला रूग्णाचे प्राण वाचविणो हेच प्रथम कर्तव्य आहे. प्रत्येक डॉक्टरनी वैद्यकीय सेवा धर्म पाळला पाहिजे, असा सल्ला ही त्यांनी दिला.

डॉ. नेगूलर म्हणाले, सध्या तरूण पिढी भरकटलेली दिसून येत आहे. दिवसभर फक्त खात सुटले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मधुमेह, रक्तदाब अश्या विविध समस्या दिसून येत आहेत. आईवडिलांची सेवा करायच्या वयात त्यांचीच आईवडील सेवा करीत आहेत. योग्य व्यायाम आणि आहार ठेवल्यास मधुमेह नियंत्रित होऊ शकतो, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विश्वास पुराणिक यांनी केले. डॉ. सुनील गडकरी, डॉ. पिपुंटकर आणि डॉ.निशिकांत पतंगे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनय भोळे यांनी केले.