शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचा कारभार आयुक्तांविना ठप्प?

By admin | Updated: April 20, 2017 03:58 IST

केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन हे सध्या प्रशिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. परंतु, त्यांचा प्रभारी कार्यभार सांभाळणारे भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ.

कल्याण : केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन हे सध्या प्रशिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. परंतु, त्यांचा प्रभारी कार्यभार सांभाळणारे भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे हे केडीएमसीत फिरकत नसल्याने महापालिकेचा कारभार ठप्प झाल्याचे चित्र आहे. गुरुवारच्या महासभेला तरी म्हसे उपस्थित राहतील का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यात आता भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने ते आता केडीएमसीसाठी किती वेळ देतील, अशी चर्चाही पालिका वर्तुळात आहे. रवींद्रन हे ९ एप्रिलला प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेले आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यभार भिवंडीचे आयुक्त म्हसे यांच्याकडे प्रभारी म्हणून सोपवण्यात आला आहे. रवींद्रन प्रशिक्षणाला गेल्यापासून शनिवारचे मलंग रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन वगळता अन्य कु ठल्याही दिवशी म्हसे हे केडीएमसीत फिरकलेले नाहीत. परिणामी, येथील कारभार एक प्रकारे ठप्प झाल्याचे चित्र आहे. आयुक्त नसल्याने अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच फावले आहे. आयुक्तांविना दैनंदिन कारभारावरही परिणाम झाला आहे. केवळ अतिक्रमण पाडण्याची मोहीम काही ठिकाणी प्रभाग अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील व कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्यात खडाजंगी झाली होती. म्हसे महापालिकेत येत नसल्याने अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनीच पाटील यांना समज दिली होती.दरम्यान, आता भिवंडीच्या निवडणुकांमुळे म्हसे त्यात व्यस्त झाले आहेत. परिणामी, त्यांचा अधिक वेळ तेथे खर्च होणार आहे. रवींद्रन हे ५ मे रोजी प्रशिक्षणावरून परतणार आहेत. तोपर्यंत महापालिकेची धुरा कोणाच्या खांद्याावर, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)