शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे मिशन इलेक्शन; अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:45 IST

फुलपाखरू उद्यान, युथ पार्कचा समावेश

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची (केडीएमसी) आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेली निवडणूक लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार केला आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहर स्वच्छता, आर्थिक शिस्त आणि सुप्रशासन यावर भर दिला आहे. त्यात कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावणाºया सोसायट्या व त्या प्रभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जाईल, अशी घोषणा केली आहे. तसेच उत्कृष्ट काम करणाºया कर्मचाºयांना कर्मवीर पुरस्काराने गौरविण्याची अनोखी संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे.आयुक्तांनी एक हजार ९९७ कोटी ७९ लाखांचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांना सादर केला आहे. आधारवाडी डम्पिंग १५ मे अखेर बंद करून बारावे, उंबर्डे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. तसेच सध्याच्या डम्पिंगच्या ठिकाणी सनसेट पॉइंट विकसित केला जाणार आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना याबरोबरच चांगली व स्वस्त दरात आरोग्यसेवा पुरवण्यासाठी आपला दवाखाना व प्रभाग दवाखाना व पाच ठिकाणी डायलिसिस केंदे्र सुरू करण्याचे ठरवले आहे.बागा व वृक्षांची जोपासना करताना डोंबिवली पश्चिमेत फुलपाखरू उद्यान, कल्याण पश्चिमेत युथ पार्क विकसित केले जाणार आहे. सिटी पार्कच्या जागेत तारांगण विकसित केले जाणार आहे. विविध खेळांच्या मार्गदर्शनासाठी प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच बास्केटबॉल व फुटबॉलसाठी मैदान विकसित केले जाणार आहे. तृतीयपंथीयांसाठी विशेष स्वतंत्र प्रसाधनगृह तयार केले जाणार आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत २४ प्रकल्प तयार केले जाणार आहेत. त्यापैकी पाचसुरू होण्याच्या मार्गावर आहेत, तर, दोन निविदा स्तरावर आहेत. प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्याची ५० कोटींच्या रकमेची तरतूद केली आहे. अग्निशमन केंद्रांसाठी १० कोटींची तरतूदमहापालिका इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी १५ कोटींची तरतूद आहे. स्मशानभूमीसाठी महसुली व भांडवली खर्च मिळून सात कोटी ३५ लाखांची तरतूद आहे. नाट्यगृहे व क्रीडा केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी सहा कोटी ७५ लाख रुपये ठेवले आहेत.अग्निशमन दलासाठी ७० मीटर उंचीची हायड्रोलिक प्लॅटफॉर्म असलेली शिडी खरेदीकरिता १३ कोटींची तरतूद आहे. दोन अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी १० कोटींची तरतूद आहे. उड्डाणे व पूल बांधण्याच्या कामासाठी २४ कोटी रुपयांची तरतूद आहे. दुर्बल घटक नागरी वस्तीतील विकासकामांसाठी दोन कोटींची तरतूद तर, अविकसित भागांसाठी पाच कोटींची तरतूद केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका